ग्रीन फिंगर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा

ग्रीन फिंगर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 01/11/2023 :
दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणूनही साजरा केला जातो .
आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयांमध्ये प्राचार्य डॉ .शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्राध्यापक अनिल लोंढे, इतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय एकता दिन साजरा केला गेला .
सरदार वल्लभभाई पटेल व भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेची पूजन प्राचार्य डॉक्टर शिंदे उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित सर्व प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी शपथ घेतली .
550 हून अधिक संस्थानाचे देशात विलनीकरण करण्याच्या त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव करण्याच्या साठी हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा केला जातो .
या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदे म्हणाले भारतासारख्या वैविध्यतेने परिपूर्ण अशा देशात तेथील लोकांमधील एकता अत्यंत महत्त्वाची आहे ज्यावेळी अनेक संस्थानाचे तुकडे झाले होते त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताच्या संकल्पनेचे समर्थन केले .त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर कार्यकर्त्यांना देशाला जोडण्यासाठी केलेला संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो .
विविधतेत एकता च्या भावनेला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय अखंडता राखण्याला महत्त्व देणार हा दिवस आहे .
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 2014 मध्ये अधिकृतपणे राष्ट्रीय एकात्मता दिवसाची घोषणा केली .
सरदार वल्लभभाई पटेल यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 2014 मध्ये अधिकृतपणे राष्ट्रीय एकात्मता दिवसाची घोषणा केली अखंड आणि सशक्त भारताचे कट्टर समर्थक असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवसाच्या अवचित्य साधून हा दिवस भारत सरकारने जाहीर केला या कार्यक्रमात बोलताना पुढे प्राचार्य डॉक्टर शिंदे म्हणाले 2018 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात मधील नर्मदा नदी जवळ स्थित भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी चे उद्घाटन केले एक भारत श्रेष्ठ भारत ही पटेल यांची प्रसिद्ध घोषणा आजही राष्ट्राला प्रेरणा देत आहे .
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक व न्याय समन्वयक प्राध्यापक अनिल लोंढे यांच्या मनोगतामध्ये म्हणाले आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल हे केवळ स्वातंत्र्यसैनिकच नव्हते तर दूरदृष्टी असलेले नेतेही होते. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत ही त्यांचे योगदान होते ते सदैव अन्याय समता आणि एकदा यांच्या बाजूने उभे राहिले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक अनिल लोंढे यांनी केले .