२३०५ खेळाडूंच्या सहभागाने प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धा गाजल्या.

२३०५ खेळाडूंच्या सहभागाने प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धा गाजल्या.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India. 9860959764.
अकलूज दिनांक 30/10/2023 :
कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या बालक्रीडा स्पर्धेत २३०५ बालचमूंनी सहभाग घेतला.
विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे बाल खेळाडूंनी सहकार महर्षि व कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यांच्या हस्ते आकाशात कबुतरे सोडण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन मंडळाच्या अध्यक्षा कु स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व मैदान पूजनाने झाले.
स्पर्धेस प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी भेट देऊन बालचमुंचे कौतुक केले.यावेळी दीपकराव खराडे पाटील, महादेव अंधारे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील प्रमुख उपस्थित होते.
या स्पर्धेत सहा विविध खेळ प्रकारात
१२२८ मुले व १०७७ मुली असे एकूण २३०५ खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-लहान गट, डोक्यावर चेंडू घेऊन पळणे, मुले प्रथम धारासिंह लोमटे, द्वितीय दानिश शेख, तृतीय शंभू सुतार, मुली प्रथम आर्वी फाळके, द्वितीय वेदिका इंगोले, तृतीय तनिषा बोरावके, मोठा गट ८० मीटर धावणे मुले प्रथम आहान शेख, द्वितीय विनीत घोडके, तृतीय स्वराज कुंभार, मुली प्रथम संघर्षा मगर, द्वितीय ईश्वरी कांबळे, तृतीय सई जाधव, इयत्ता १ली कंबरेवर हात ठेवून उड्या मारत जाणे, मुले प्रथम रेयांश येवले, द्वितीय अथर्व खिचडे, तृतीय जयदीप जाधव, मुली प्रथम श्रावणी देवकर, द्वितीय स्वराली कांबळे, तृतीय शिवन्या माने, इयत्ता २री लंगडी घालत जाणे, मुले प्रथम मानव काटकर, द्वितीय स्वराज्य संघशेट्टी, तृतीय प्रज्वल दुधाळ, मुली प्रथम आरोही महामुनी, द्वितीय श्रेया मगर, तृतीय रिध्दी मोहिते, इयत्ता ३ री तीन पायांची शर्यत, मुले प्रथम दानिश तांबोळी व शिवेंद्र भोसले, द्वितीय अथर्व भोसले व वैभव सरगर, तृतीय धवन नवगिरे व आदित्य जाधव, मुली प्रथम श्रावणी लखेरी व ईश्वरी इदाते, द्वितीय आराध्या भगत व स्वरा शिंदे, तृतीय वेदिका गायकवाड व जान्हवी माने, इयत्ता ४ थी पोत्यात पाय घालून उड्या मारत जाणे, मुले प्रथम समर्थ शिंदे, द्वितीय विहान मगर, तृतीय समर्थ मगर, मुली प्रथम स्वरा दुधाळ, द्वितीय अंकिता काळे, तृतीय सृष्टी राऊत या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले.
स्पर्धेसाठी तीन चाकी सायकल, कॅरम बोर्ड, स्कूल बॅग, टिफिन डबा, सुवर्ण,रोप्य व ब्राँझ मेडल आणि प्रत्येक सहभागी खेळाडूंसाठी प्रमाणपत्र स्केचपेन बॉक्स व खाऊ देण्यात आले.
स्पर्धा प्रमुख शिवाजी पारसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन आर.आर. पाटील, किरण सूर्यवंशी व शकील मुलाणी यांनी केले . भानुदास आसबे यांनी आभार मानले. यावेळी मंडळाचे सचिव बिभिषन जाधव, सदस्य प्रताप पाटील, यशवंत माने देशमुख, विश्वनाथ आवड, भीमाशंकर पाटील, बाळासाहेब सावंत, राहुल गायकवाड, रामचंद्र मिसाळ, नंदकुमार गायकवाड, विशाल लिके, सुहास थोरात, फिरोज तांबोळी यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक, पंच, सदस्य, खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेबद्दल मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी सर्वांचेच कौतुक केले.