⭕कोळशिंध्यांनी केलेल्या हल्यात २ शेळ्या व १ बोकड ठार. 🟣चंदगड तालुक्यातील कलिवडे धनगरवाड्यावरील घटना

⭕कोळशिंध्यांनी केलेल्या हल्यात २ शेळ्या व १ बोकड ठार.
🟣चंदगड तालुक्यातील कलिवडे धनगरवाड्यावरील घटना
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
चंदगड दिनांक 22/10/2023 : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधील कलिवडे गावी कोळशिंध्यांनी केलेल्या हल्यात २ शेळ्या व एका बोकडाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवार दिनांक वीस रोजी सायंकाळी घडली. यामध्ये धनगर वाड्यावरील रहिवासी विठु बाजारी यांचे चाळीस हजार रुपये आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की विठु धोंडू बाजारी या वय ७० वर्षे रा. कलिवडे धनगर वाडा ता. चंदगड जि. कोल्हापूर हे नेहमीप्रमाणे आपल्या ६ शेळ्यांचा कळप चारण्यासाठी शिवारात घेऊन गेले होते. किटवडे सर्वे नंबर मध्ये एकनाथ विष्णू पाटील यांच्या हद्दीतून घरी शेळ्यांना घेऊन येत असताना सायंकाळी ६ वा. अचानक आलेल्या पाच कोळशिंध्ये शेळ्यांच्या कळपात घुसले.. काही कळायच्या अगोदर कोळशिंधेच्या भितीमुळे शेळ्या जीव वाचवण्यासाठी बिथरून जंगलात पळाल्या तरीही विठु बाजारींनी क्षणाचा ही विलंब न करता हातात असलेल्या काठीने कोळशिंध्यांना पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले. व तीन शेळ्यांना वाचवले परंतु दोन शेळ्या व १ बोकड मात्र कोळशिंध्यांनी ठार मारले… शेवटी विठु बाजारी हे तीन शेळ्यांना घेऊन घरी आले.घरात तीन शेळ्यांना ठेऊन परत त्यांनी इतर शेळ्या समाजबांधवांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला परंतु इतर २ शेळ्या व १ बोकड कोळशिंध्यांनी ठार मारून खात होते. विठु बाजारी व इतरांना पहाताच ते शेळ्यांचे अर्धवट अवशेष टाकून जंगलात पळुन गेले. त्यांचे अवयव (अवशेष) इतरत्र विखरून पडलेले होते.
विठु बाजारी यांनी हि घटना तात्काळ आपला मुलगा भिकाजी बाजारी यांना सांगितली. भिकाजी बाजारी यांनी वन कर्मचाऱ्यांना घटना कळविण्याचा प्रयत्न केला असता वन कर्मचाऱ्यांनी घटना जंगलात घडली असल्याने तुम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही व पंचनामा करता येत नाही असे सांगितले. अखेर भिकाजी बाजारी यांनी तात्काळ यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्याशी 940 50 73 872 या नंबर वर फोन करून घडलेली घटना सांगितली.व मदत करण्याची विनंती केली.
संजय वाघमोडे यांनी तात्काळ चंदगड विभागाचे वनपरिक्षेत्रअधिकारी आवळे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून घडलेली घटना सांगून घटना स्थळी उपस्थित राहुन पंचनामा करण्याबाबत विनंती केली.अखेर घटना स्थळी वन कर्मचाऱ्यांनी उपस्थितीत राहुन घटनेचा पंचनामा केला.
१९९३ च्या परिपत्रकात “जर एखाद्या पाळीव प्राण्यांचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात वन हद्दीत मृत्यू झाला तर नुकसान भरपाई देण्यात येऊ नये. अशी होती ती अट शासनाने ७ जुलै २००४ मध्ये शिथिल करून जर एखाद्या पाळीव प्राण्यांचा वन हद्दीत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी असे परिपत्रक जारी केले आहे. तरीही वन कर्मचारी शेतकरी व व पाळीव प्राण्यांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे शेतकरी व धनगर समाज बांधवांना आर्थिक फटका बसत आहे. याबाबत शासनाने याची गंभीर दखल घेऊन वन कर्मचारी यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात याबाबत यशवंत क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक डी गुरुप्रसाद यांच्याशी चर्चा करून या परिपत्रकाबाबत सांगितले असता नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी मान्यही केलेले आहे. व तशा सुचनाही मिटिंग मध्ये देऊन ही काही कर्मचारी नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत उपवनरक्षकांनी तसे परिपत्रक काढून परत एकदा वन कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात व जे कर्मचारी नुकसान भरपाई देणेबाबत पंचनामे करणार नाहीत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी” : संजय वाघमोडे (संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य)