सदाशिवराव माने विद्यालयामध्ये ‘भोंडला’ उत्साहात साजरा.

सदाशिवराव माने विद्यालयामध्ये ‘भोंडला’ उत्साहात साजरा.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 20/10/2023 :
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयात ‘भोंडला’ हा पारंपारिक खेळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित असलेला स्त्रियांचा हा सामुदायिक खेळ आहे. नवरात्रीचे नऊ दिवस व दसऱ्याच्या दिवशी हा खेळ खेळला जातो.
विद्यालयामध्ये मैदानाच्या मध्यभागी हत्तीची मूर्ती मांडून त्याची पूजा अकलूज ग्रामपंचायत च्या माजी सदस्या सौ. शितलदेवी सतिशराव माने-पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माता-पालक संघाच्या उपाध्यक्षा वैशाली पताळे, स्वप्नाली कदम, रुपाली दबडे, कल्पना कांबळे, सिद्धी माने-पाटील, मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, पर्यवेक्षक व सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
मुलींनी हत्तीभोवती फेर धरला व स्नेहा शिंदे, पवार व वाद्यवृंदातील विद्यार्थिनींनी पारंपारिक गाणी म्हणत या खेळाचा आनंद लुटला. मुलींनी घरून येताना खिरापत आणली होती ती सर्वांना वाटली व त्याचसोबत खिरापत ओळखण्याचा मनोरंजक खेळ खेळण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अंजली सावंत यांनी केले तर सुनीता ठोंबरे यांनी आभार मानले.