भगवान महावीर पुरस्काराने मिहीर गांधी सन्मानित

भगवान महावीर पुरस्काराने मिहीर गांधी
सन्मानित
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10/10/2023 : श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांना डोंबिवली येथे
23 वा भगवान महावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रविवार दि ८ ऑक्टोबर रोजी डोंबवली(पूर्व) येथील भगवान महावीर 2500 वा मुक्ती महोत्सव मंडळ यांच्या वतीने “२३ वा भगवान महावीर पुरस्कार” प पू स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ कोल्हापूर रायबाग होसुर बेळगावी यांच्या हस्ते सपत्नीक गौरविण्यात आले. श्री सन्मती सेवा दल अल्पसंख्याक बहूउद्देशीय संस्था सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था समाजात कार्यरत असल्यानेच आज शहरासह ग्रामीण भागातही जैन समाज अस्तित्व टिकवून आहे, जैन धर्माचा, जिनवाणीचा प्रसार आणि जैन बांधवांत एकता व संघटन करत समाज हितकारक, धार्मिक, पर्यावरणपूरक
आरोग्य विषयक काम मिहीरभाई गांधी यांच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन कोल्हापूर, रायबाग, होसुर-बेळगावी संस्थान मठाचे प.पू.स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक यांनी डोंबिवली येथील सत्कार समारंभ कार्यक्रमात येथे केले.
आयोजक मुक्ती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा संगीता पेठकर म्हणाल्या मिहीरभाई गांधी यांनी श्री सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक, पर्यावरणपूरक, सांस्कृतिक तसेच सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दखलपात्र कार्य केले आहे.समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या रुग्णांना दलाच्या माध्यमातून ४० लाख रुपयांची मदत केली,गत अनेक वर्षांपासून जैन धर्मियांची काशी म्हणून ओळख असलेल्या झारखंड राज्यातील तीर्थराज श्री सम्मेद शिखरजी पर्वतावर स्वच्छता अभियान राबविले जातेय व त्याची गोल्डन बुक मध्ये नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अनेक प्राचीन जैन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला व तरुण तरुणींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, राज्यस्तरीय वधुवर मेळावे भरविण्यात येतात,दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, गोशाळेस चारा वाटप करण्यात येतो आदी उपक्रमांची दखल घेऊन मिहीरभाई गांधी यांना हा पुरस्कार देण्यात आला.
सत्कारास उत्तर देताना मिहीरभाई गांधी म्हणाले की हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून श्री सन्मतीच्या सर्व टीम व त्यांच्या कुटुंबीयांचा आहे,रात्री अपरात्री सदस्यांना फोन केला की माझ्यावर विश्वास ठेवून सदस्यांचे आईवडील, पत्नी, बहीण ,भाऊ त्यांना चांगलं कांही तरी करायला जातोय असं संबोधुन आडवेडे न घेता पाठवतात.समाजासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहील,मनोगत व्यक्त करताना मिहिरभाई यांना गहिवरून आले.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा संगीता पेठकर, रेल्वेचे पर्यटन विभाग प्रबंधक रविकांत जंगले,रावसाहेब पाटील,अरुण जैन, प्रकाश बेलसरे, राजेंद्र देशमाने, अमोल दोशी, सुदेश पाटील, प्रवीण होसुरे, साजेश दोशी, शिरीष पाटील, नितीन जैन, श्रीमती प्रतिभा वैद्य, धरणेंद्रा जगनवार , हिराचंद बुबने, अमोल येणुगुरे, सोणिक शहा, प्रतिष्ठाचार्य डॉ पंकज जी उपाध्ये , यांच्यासह श्री सन्मती सेवा दलाचे मार्गदर्शक डॉ रावसाहेब पाटील, डॉ श्रेणीक शहा, प्रिया शहा, नंदकुमार दोशी, किरण शहा, सचिन शहा, निलेश गांधी, विनोद मोदी तसेच माजी अध्यक्ष विरकुमार दोशी, नवजीवन दोशी, महावीर शहा, डॉ.राजेश शहा, प्रितम कोठारी, मयुर गांधी, संदेश गांधी, अभिजीत दोभाडा, निनाद चंकेश्वरा,योगेश गांधी, विरेंद्र दोभाडा, नमन गांधी, केतन दोशी, अक्षय दोशी,योगराज गांधी, महावीर दोशी, चंद्रसेन डुडु, प्रदीप झाडे, राहुल शहा,महावीर शहा,पंकज दोशी,पराग गांधी, प्रविण दोशी, सन्मती दोशी, गोमटेश दोशी यांच्यासह सोलापूर,सातारा, उस्मानाबाद, पुणे, नगर जिल्ह्यातील विविध भागातील संचालक सदस्य व सकल जैन डोंबिवली परिवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सन्मती होसूरे आणि श्रीमती प्रतिभा वैद्य यांनी आभार मानले.