उद्योग महर्षि उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान अकलूज मध्ये राज्यस्तरीय उद्योगमहर्षि चषक बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन

उद्योग महर्षि उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या जयंती निमित्त 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान अकलूज मध्ये राज्यस्तरीय उद्योगमहर्षि चषक बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 06/10/2023 : उद्योग महर्षि कै.उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या 64 व्या जयंती निमित्त उदयसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ, महर्षि जिमखाना व स्पोर्टस् असोसिएशन, माळशिरस तालुका बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथे राज्यस्तरीय निमंत्रीत बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवरत्न उद्योग समुहाचे चेअरमन किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील व माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
स्पर्धा प्रमुख सौ.ईश्वरीदेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रिडा संकुलाच्या भव्य मैदानावर दिनांक 13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून प्रथम क्रमांकास रू. 51 हजार, द्वितीय क्रमांकास रू.31 हजार, तृतीय क्रमांकास रू. 21 हजार व चतुर्थ क्रमांकास रू. 11 हजार रूपयांची रोख बक्षीसे व ट्राफी देण्यात येण्यात येणार आहे तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला 3001 रूपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी मुंबई, सातारा, सोलापूर, पुणे, बीड, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक शहरातील सुमारे 16 संघांचा निमंत्रीत संघांनी सहभाग नोंदविला आहे.