प्रभू श्रीरामचंद्र सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्षपदी डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील तर उपाध्यक्षपदी आण्णासाहेब शिंदे

प्रभू श्रीरामचंद्र सार्वजनिक मंडळाच्या अध्यक्षपदी डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील तर उपाध्यक्षपदी आण्णासाहेब शिंदे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27 डिसेंबर 2024 :
अकलूज ता.माळशिरस येथील प्रभु श्रीरामचंद्र सार्वजनिक मंडळ अकलूज या संस्थेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली या संस्थेच्या अध्यक्षपदी जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी बिजवडी गावचे माजी सरपंच आण्णासाहेब शिंदे नियुक्त झाले.
संस्थेच्या सदस्यपदी पद्मजादेवी मोहिते-पाटील, मानसिंह भोसले,धनश्रीताई घुले-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील, माणिकराव मिसाळ, दिपक सुत्रावे, मल्लिकार्जुन वैद्य देशमुख, नितीन शिंदे,शेखर शेंडे यांची निवड करण्यात आली .
या संस्थेअंतर्गत श्रीराम मंदीर व भक्त निवास समाविष्ट आहेत. यासह वर्षभर परिसरातील भाविक भक्त व नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असल्याची माहिती व्यवस्थापक रामदास रणवरे यांनी दिली.