गुणवंतांचा सन्मान करण्याचा सोहळा हा कौतुकास्पद : वैष्णवीदेवी मोहिते पाटील

गुणवंतांचा सन्मान करण्याचा सोहळा हा कौतुकास्पद : वैष्णवीदेवी मोहिते पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 27/9/2023 :
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे त्याचबरोबर समाजाला सन्मानपात्र कार्याला उत्तेजित करणे या, सहकार महर्षिंनी सुरू केलेल्या परंपरेला अनुसरूनच राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय किर्तीचे क्रीडा नैपुण्य संपादित करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्याचा हा सोहळा कौतुकास्पद असल्याचे मत माळशिरस तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
प्रेस संपादक व सेवा संघ आणि भारतीय दलित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सन्मान सोहळा वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तेव्हा त्या बोलत होत्या. शुभम प्रकाश क्षिरसागर नेमबाजी मध्ये नॅशनल पदक विजेता , अमिर मौला काझी शूटिंग हाॅलीबाॅल महाराष्ट्र संघाचे सात वर्षे कर्णधार, सुयश नारायण जाधव जलतरण पट्टू अर्जून पुरस्कार, किरण प्रभू नवगिरे क्रिकेट पट्टू, निक्षित सुरेश खिलारे जिनमॅस्टिक , कोमल एकनाथ शिंदे दांड पट्टा क्षेत्रात पाच वेळा राष्ट्रीय सुवर्ण पदक या खेळाडूंना सौ मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असला तरी समाजातील काही लोकांना वंचित ठेवले गेले आहेत अशाच लोकांसाठी भारतीय दलित संसद काम करीत असून आम्हाला संघटन उभा न करता चळवळ उभी करायची आहे. यामध्ये जाणीव असलेल्या लोकांनाच सहभागी करायचे आहे. कारण जाणीव असलेले लोकच समाजासाठी काहीतरी करू शकतात. अशा जाणीव असलेल्या लोकांच्या मदतीने वंचितांसाठी काम करणार असल्याचे मत डॉक्टर अंबादास सकट यांनी या प्रसंगी व्यक्त केले.