श्री गणेश मूर्ती विसर्जना बाबत नगरपरिषदेचे जाहीर आवाहन

श्री गणेश मूर्ती विसर्जना बाबत नगरपरिषदेचे जाहीर आवाहन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 27/9/2023 :
अकलूज नगरपरिषद वतीने सर्व अकलूज परिसरातील नागरीकांना सुचित करण्यात येते की, निरा नदीमध्ये पुरेसे पाणी आल्याने गणेश विसर्जनाकरीता निरा नदीतच सुविधा निर्माण झालेली आहे.हि बाब विचारात घेता नगर परिषदेने घरोघरीं जाऊन मूर्ती संकलन करण्याचे व एकत्रीत करून इतर पाणी उपलब्ध असल्याचे ठिकाणी विसर्जन करण्याची प्रक्रिया रद्द केली आहे.तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन अकलूज नगरपरिषद परिसरातील घाटावरच करावे.विसर्जन करताना सदरील मूर्तींचे विधीवत पूजन करून नगरपरिषद कर्मचारी यांच्या ताब्यात द्यावी.कोणीही नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये.असे आवाहन अकलूज नगरपरिषदेच्या वतीने अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले आहे.