एफ आर पी पेक्षा ज्यादा दरामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार

एफ आर पी पेक्षा ज्यादा दरामुळे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 20/9/2023 : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील विकास पर्वाचा केंद्रबिंदू ठरलेल्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याने सन 2022 – 23 हंगामातील गळितास आलेल्या उसाला एफ आर पी पेक्षा 111/-रुपये जादा दर दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. एफ आर पी पेक्षा ज्यादा दर देण्याचे जाहीर केल्या बद्दल स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने
श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील व अर्जुनसिंह मोहिते – पाटील, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल यांचा सत्कार माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, जिल्हा युवा उपाध्यक्ष दत्ता भोसले, सदाशिवनगर शहर अध्यक्ष पप्पु घाडगे, आंनद थोरात यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळी करण्यात आला. या वेळी कारखान्याचे खाते प्रमुख उपस्थित होते.