आदिवासी आश्रम शाळेतील सागर बावणे विद्यार्थ्याचा मृत्यू 🔴या प्रकरणाची मुख्यमंत्री यांनी न्यायालयीन चौकशी करावी. 🔵ही समाज माध्यमातून मागणी
आदिवासी आश्रम शाळेतील सागर बावणे विद्यार्थ्याचा मृत्यू
🔴या प्रकरणाची मुख्यमंत्री यांनी न्यायालयीन चौकशी करावी.
🔵ही समाज माध्यमातून मागणी
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 20/9/2023 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांच्या द्वारा मान्यता प्राप्त अनुदानित आदिवासी आश्रम शाळा धानोरा तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे सागर बावणे या इयत्ता तिसरी मधील विद्यार्थ्यांचा घातपातामुळे मृत्यू झालेला आहे. तथापि आर्थिक हितसंबंध आणि राजकीय वरदहस्त यामुळे कोणतेही अधिकारी या घटनेला दुजोरा देत नव्हते. काहीही करून सदर मृत्यू प्रकरण एक प्रकारे दडपण्याचा प्रकार संबंधितांकडून होत असल्याचे उघडकीस आले आहे. आश्रम शाळातील मृत्यूचा सिलसिला सुरूच असल्याने आश्रम शाळा या मृत्यूशाळा झाल्या आहेत काय असा प्रश्न अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता या प्रिंट मीडियाचे आणि aklujvaibhav.in या डिजिटल मीडियाचे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी उपस्थित केला आहे.
यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व अनुदानित आश्रम शाळा चालवल्या जातात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा हे आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय आहे.
दुर्गा पेठ तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील रहिवासी असलेला
विद्यार्थी सागर बावणे हा धानोरा आश्रम शाळेमध्ये इयत्ता तिसरी मध्ये प्रवेशित होता. सदर आश्रम शाळेमध्ये वीस ते पंचवीस दिवसाआधी सदर विद्यार्थ्यांचा घातपातामुळे मृत्यू झालेला आहे.
प्रकल्प अधिकारी पांढरकवडा व पोलीस स्टेशन घाटंजी यांच्यामार्फत सदर प्रकरण संस्था चालक यांनी दडपण्याचा प्रयत्न, सदर प्रकरण झाल्यापासून आजपर्यंत सुरूच ठेवला आहे.
प्रसार माध्यमातून या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची प्रसिद्धी होऊ लागल्याने सदर प्रकरणाबाबत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकरण सदर आश्रमा मध्ये घडलेली आहे हे आता नुकतेच मान्य केले असून सदर प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले. असल्याची माहिती आदिवासी जनतेचा प्रतिनिधी पत्रकार संजय वामनराव बडवाईक (95 45 96 62 49) यांनी थोड्याच वेळापूर्वी अकलूज वैभव बरोबर बोलताना सांगितली.
परंतु….धानोरा आश्रम शाळेतील घातपातामुळे विद्यार्थ्यांचा जो मृत्यू झाला त्या प्रकरणाची 20 ते 25 दिवसापासून कोठेही वाच्छता होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे याबाबत पेपरमध्ये व टीव्हीवर बातमी सुद्धा आलेले नाही आहे.
मृत झालेला सागर बावणे हा विद्यार्थी राहणार दुर्गा पेठ तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील विद्यार्थी आहे. तो भोई या जातीचा होता.आदिवासी आश्रम शाळा संहिता प्रकरण तीन नुसार सदर वस्तीगृहामध्ये निवासी विद्यार्थी म्हणून आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. हा विद्यार्थी अनिवासी विद्यार्थी म्हणून सदर आश्रम शाळेमध्ये प्रवेशित होता .
तरीपण….
सदर विद्यार्थी हा वस्तीगृहामध्ये निवासी म्हणून रात्रीला तिथेच राहत होता. आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर इतर बोगस विद्यार्थ्यांचे प्रवेश देऊन संस्थाचालक अनुदान लाटण्याचा प्रकार करीत आहेत. सदर आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांनी सागर बावणे या विद्यार्थ्याला सदर आश्रम शाळेमध्ये प्रवेशित कशाप्रकारे केले या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे.
अनिवासी विद्यार्थी निवासी दाखवून अनुदान लाटण्याचा संस्थाचालकाचा गैर कारभार आहे. मुख्याध्यापक व शिक्षक स्वतःचे पगार सुरू ठेवण्यासाठी हा गोरख धंदा करीत आहे.
अनुदान हडप प्रकरणाची प्रकल्प अधिकारी पांढरकवडा व अप्पर आयुक्त अमरावती यांना या गोरख धंद्याची विषयी परिपूर्ण माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने संस्थाचालक अनुदान हडप करण्या ची प्रक्रिया सतत वीस पंचवीस वर्षापासून सुरू आहे. दर महिन्याला आदिवासी विकास कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सदर आश्रम शाळेमध्ये भेटी होत असतात .
अनिवासी विद्यार्थी निवासी दाखवून अधिकाऱ्यांच्या शेऱ्यामार्फत सदर संस्थाचालक अनुदान दरवर्षी हडप करीत असतो.
धानोरा आश्रम शाळा येथीलज सागर बावने या विद्यार्थ्यांचा घातपातामुळे मृत्यू झालेला आहे. या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करण्यात यावी.
चालू शैक्षणिक वर्षांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा आश्रम शाळेमध्ये विद्यार्थिनीचा सदर आश्रम शाळेमध्ये मृत्यू झाला. सदर विद्यार्थ्यांनी चे पोस्टमार्टम सुद्धा करण्यात आलेले नाही. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील महांगुळी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी अद्यापही दोषीवर कार्यवाही झालेली नाही.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील नारा आश्रम शाळांमध्ये मेळघाट मधील विद्यार्थ्यांचा घातपातामुळे मृत्यू झाला. सदर प्रकरणांमध्ये एका विद्यार्थ्याला दोषी ठरविण्यात आले. प्रकरण काही वेगळेच आहे परंतु नाहक एका विद्यार्थ्यांचा येथे बळी देण्यात आला.आश्रम शाळेतील विद्यार्थिनी आज भीतीच्या वातावरणामध्ये आहे.
आश्रम शाळेमध्ये मुलीवर आज अत्याचार होत आहे. या प्रकरणाची दखल केंद्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण आश्रम शाळांची मुलींच्या सुरक्षिततेबाबत चौकशी करण्यात यावी. अशी मागणी आदिवासी जनतेचा प्रतिनिधी संजय वामनराव बडवाईक यांनी केली आहे.