जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत “ताराराणीचा” बोलबाला

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत “ताराराणीचा” बोलबाला
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 17/9/2023 :
कुर्डूवाडी येथे छत्रपती शिवराय कुस्ती संकुलात झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले.
१९ वर्ष वयोगटात ५० किलो वजनगटात कु.वेदिका नंदकुमार शेंडे हिने, ५७ किलो वजनगटात कु.सिद्धी विनोद शेळके, ५५ किलो वजनगटात कु.प्रियंका लालासाहेब पराडे, ६८ किलो वजनगटात कु.रोशनी ज्ञानेश्वर बोडके यांनी प्रथम क्रमांक पटकावला
तर १४ वर्ष वयोगटात ३९ किलो वजनगटात कु.प्रगती सम्राट काळे, ५४ किलो वजनगटात शिवांजली जितेंद्र तुपे या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवला.
कुर्डूवाडी येथे पार पडलेल्या स्पर्धेत सर्व वजनगटात ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेत ताराराणीचे वर्चस्व निर्माण केले.प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल व या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी विजयी सर्व खेळाडू व प्रशिक्षकाचे अभिनंदन केले.
अकलूजच्या ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्राने ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण उपलब्ध करून देत आहेत या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिला मल्ल राष्ट्रीय स्तरावरील राज्यभरातील कुस्ती स्पर्धेत नावलौकिक मिळवत आहेत.