एन.यू.बी.सी. ची राष्ट्रीय कार्यकारणी पंधरा-सोळा जूनला जयपूर राजस्थान मध्ये

एन.यू.बी.सी. ची राष्ट्रीय कार्यकारणी पंधरा-सोळा जूनला जयपूर राजस्थान मध्ये
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
भाग्यवंत ल.नायकुडे, अकलूज.
(दुर्गापूरा, जयपूर येथून )
दिनांक 15/06/2025 :
जयपुर राजस्थान :
राष्ट्रीय पीछडावर्ग अनुसूचित जाती जनजाती एवम अल्पसंख्यांक महासंघ ची राष्ट्रीय कार्यकारणी 15 व 16 जून 2025 रोजी जयपुर राजस्थान येथे होत आहे. 15 व 16 जून रोजी संघटनेचे संस्थापक व दिल्लीचे पहिले माजी मुख्यमंत्री व भारताचे माजी कृषीमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश जी यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम एन.यु.बी.सी. संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा एस गीता यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या बैठकीला वेस्टर्न झोनचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार , मध्य झोनचे अध्यक्ष माजी खासदार बुद्ध सेन पटेल, कलकत्त्याचे ईस्टर्न झोनचे अध्यक्ष सुब्रोतो मोदक, साउथ झोनचे अध्यक्ष राजलक्ष्मी, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष एस सुवर्णकुमार , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत ल. नायकुडे, उत्तर भारत अध्यक्ष आशिष कारखानिस, राष्ट्रीय कोषाध्यक्ष हरनाम सिंह यादव यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. या बैठकीला देशभरातील 25 ते 26 राज्यातील प्रदेशाध्यक्ष तसेच प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक उत्तर झोन व राजस्थानचे प्रदेश अध्यक्ष राजपाल मीना यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
16 जून रोजी स्व.चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्या 107 व्या जयंती निमित्त राजस्थान येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष एस गीता उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या राज्यातील प्रदेशचे अध्यक्ष उपस्थित राहणार. आहेत, यावेळी वेगवेगळ्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक व राजस्थान तसेच उत्तर झोनचे अध्यक्ष राजपाल मीना यांनी सांगितले आहे. बैठक दोन दिवस चालणार असून 15 जून रोजी सायंकाळी 5 वाजताचे पुढे सुरू होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये चौधरी ब्रह्म प्रकाश यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तसेच 16 जून रोजी सकाळी पुन्हा या कार्यक्रमाचा सांगता समारंभ होणार असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.