रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन सोहळा संपन्न

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन सोहळा संपन्न
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 13/9/2023 :
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.) या संस्थेचा 15 वा संस्था वर्धापन दिन व गुणवंत शिक्षकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महावीर फाउंडेशन पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दोशी बोलताना म्हणाले, नवनवीन आव्हाने असताना सतत चिकाटीने प्रयत्न करून रत्नत्रय वटवृक्ष उभा केलेला आहे. संस्थेच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. माळशिरस पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे म्हणाले, ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी, ही विलक्षण तळमळ दोशी परिवारामध्ये होती म्हणून त्यांनी शाळा उघडली. त्यांनी आजपर्यंत खूप मोठा संघर्ष केलेला आहे याचा मला खूप अभिमान वाटतो, यामुळे अनंतलाल दादा व त्यांचा परिवार खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षि ठरतात. त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी यांनी मार्गदर्शन करताना शाळेची प्रगती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे मध्ये सतत व सातत्याने नव-नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षिणक, सांस्कृतिक आणि क्रीडा आदी माध्यमातून बदल घडत आहेत. इयत्ता दहावी व बारावीचा बोर्डाचा आज पर्यंत प्रत्येक वर्षी निकाल शंभर टक्के लागलेला आहे.
सदर प्रसंगी तिन्ही शाखेतील सर्व आदर्श शिक्षकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी राजेंद्र दोशी ( संस्थापक अध्यक्ष महावीर फाउंडेशन पंढरपुर), राजेंद्र टाकणे (पोलीस निरीक्षक माळशिरस) अनंतलालदादा दोशी ( संस्थापक रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदशिवनगर), अजित दोशी (कार्यकारणी सदस्य 1008 दिगंबर जैन मंदिर गोवा ), अनंतकुमार दोशी (प्रसिद्ध व्यापारी फलटण), अभय दोशी, सदाशिवनगरचे सरपंच विरकुमार अनंतलाल दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर चे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी, पुरदावंडे ग्रामपंचायत संरपच देवीदास ढोपे, अभिजित दोभाडा, वेभव शहा, बाहुबली दोशी, सुरेश धाईंजे, सनतकाका, रामदास कर्णे, वसंत ढगे,सूरज दोशी , अजय गांधी, बबन गोपणे, विठ्ठल अर्जुन, चंद्रकांत तोरणे, विष्णु भोंगळे, संतोष शिंदे, ज्ञानेश राऊत, भाग्यश्री दोशी, विनयश्री दोशी, प्रणिती दोशी, सारिका राऊत, धनश्री दोशी, किर्तिका राऊत, संतोष गुरव, अमित पाटील, देवत वाघमोडे , विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षका निंबाळकर व्ही. बी. व आभार प्रदर्शन सदाशिवनगरचे सरपंच व रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन वीरकुमार दोशी यांनी केले.