ताज्या घडामोडी

शहरी गटात जिजामाता कन्या प्रशाला अकलूज तर ग्रामीण गटात श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी

शहरी गटात जिजामाता कन्या प्रशाला अकलूज तर ग्रामीण गटात श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 26/12/2023 :
प्रताप क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या ४६ व्या राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेत शहरी गटात जिजामाता कन्या प्रशाला अकलूज, तर ग्रामीण गटात श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस या संघांनी स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांना स्वतंत्र सन्मानचिन्ह, मेडल, रोख रक्कम देऊन उपस्थितांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्मृतिभवन शंकरनगर येथे प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने दिनांक २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते.श्रीमती कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष, जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील या बंधूंच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, सौ.सुलक्षणादेवी मोहिते पाटील, सिने अभिनेत्री प्रिया मराठे, सौ.सुमित्रादेवी खानविलकर, सौ. ऋतुजादेवी मोहिते पाटील, मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, चि. सयाजीराजे मोहिते पाटील, कु. कृष्णप्रिया मोहिते पाटील, दीपकराव खराडे पाटील, ॲड. नितीनराव खराडे पाटील, महादेव अंधारे, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभिशन जाधव, परीक्षक कुणाल मसाले, सागर राऊत, रितेश नाग उपस्थित होते.


यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, प्रत्येक पालकाला वाटते माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर व्हावा, परंतु एखादा कलाकार निर्माण करणं हे खूप अवघड काम आहे. प्रताप क्रीडा मंडळाच्या समूह नृत्य स्पर्धेमुळे अनेक मोठे कलावंत घडले आहेत. राष्ट्रपती पदक ही पटकवले आहेत. ४६ वर्षांपूर्वीची स्पर्धा व आजची स्पर्धा यामध्ये फार मोठा बदल घडला आहे.या मध्ये विद्यार्थी कलाकार व पालकांचा मोठा सहभाग आहे. पुढील वर्षी रत्नाई आयडॉल हा खूला गट ठेवावा असे त्यांनी सांगितले.
सिने अभिनेत्री प्रिया मराठे म्हणाल्या,प्रताप क्रीडा मंडळाने कलाकारासाठी जो मंच उपलब्ध करून दिला आहे हा अनमोल आहे. ही ऊर्जा खूप महत्त्वाची आहे. कलाकारांनी या संधीचा फायदा करून घ्यावा. दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होऊन स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे. महाविद्यालयाच्या बाहेरचा प्रवास खूप खडतर आहे.परंतू ही स्पर्धा अत्यंत सुरक्षितता देते. स्वतःचे ध्येय ठरवा, स्वप्न पहा व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असेही सांगितले.
स्पर्धेच्या आयोजिका व मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ व प्रोत्साहन मिळावे यासाठी जयसिंह मोहिते-पाटील यांनी या स्पर्धेला सुरुवात केली. सलग ४६ वर्ष सुरु असणारी देशातली एकमेव स्पर्धा आहे. पुढील वर्षी राष्ट्रीय पातळीवरचे ग्रुप या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्याचा मानस आहे. स्पर्धेत ७५ शाळांतील २४८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील क्रमांका पेक्षा सहभाग घेतल्याचे आत्मिक समाधान मिळते तेच आपले मेडल असल्याचेही त्यांनी कलाकारांना संबोधित करताना सांगितले.स्पर्धाप्रमुख मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी तीन दिवसात१३२ गीतांचे सादरीकरण झाल्याचे सांगितले.
स्पर्धेचा निकाल (इ.५वी ते १०वी) ग्रामीण गट प्रथम क्रमांक श्री बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस, द्वितीय क्रमांक (विभागून) स.म. शंकरराव मोहिते पाटील विद्यालय, वेळापूर, श्री गणेश विद्यालय, पिंपळनेर, सदाशिवराव माने विद्यालय, माणकी तृतीय क्रमांक- कृष्णानंद विद्यामंदिर, पाटीलवस्ती.
शहरी गट- प्रथम क्रमांक-
जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज द्वितीय क्रमांक- महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर,
तृतीय क्रमांक – सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button