सोलापूर तापले, रविवारी पारा ४३ अंशाच्या वर. अनेक ठिकाणचे रस्ते ओस पडल्याचे चित्र….
सोलापूर तापले, रविवारी पारा ४३ अंशाच्या वर.
अनेक ठिकाणचे रस्ते ओस पडल्याचे चित्र….
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
साेलापुर(प्रतिनिधी),दिनांक 28/04/2024 :
सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य वाढ होऊन ते रविवारी या वर्षातील सर्वाधिक तापमान ४३.७ अंशांच्या घरात गेले आहे.
शुक्रवार दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी या हंगामातील ४३.१ अंश इतके सर्वाधिक तापमान होते.
या वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. सकाळी नऊपासूनच उकाडा जाणवत असून यात आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे. बुधवारी
२४ एप्रिल २०२४ रोजी ४१.२, गुरुवारी ४१.१, शुक्रवारी ४१.२, शनिवारी दि. २७ एप्रिल २०२४ रोजी ४२ अंशांच्या घरात गेले होते. रविवारी शहराचे तापमान यंदाच्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे ४३.७ अंश सेल्सियस इतके वाढले आहे.
असह्य़ तापमानामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाला चटके बसू लागल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून फिरणे टाळले आहे. तर दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे.
नागरिक उन्हात कामे करणे टाळत आहेत. डोक्यावर उन्हाळी टोप्या,
खांद्यावर पांढरे गमजे घालणे पसंत केले जात आहे, तर महिलावर्ग तोंडावर स्कार्फ घालून फिरताना दिसत आहेत. परंतु ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकरी व हमालांना भर उन्हात कामे करावी लागत आहेत.