सौ.नेहा काजळे यांना पीएचडी प्रदान.

सौ.नेहा काजळे यांना पीएचडी प्रदान.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 13/7/2023 :
अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या काॅलेज ऑफ फार्मसीच्या प्राध्यापिका नेहा सचिन काजळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे नुकतीच पीएचडी पदवी संपादन केली आहे.त्यांनी डेव्हलपमेंट अँड इव्हॅलुएशन ऑफ ड्रग डिलीव्हरी सिस्टीम फाॅर ॲन्टी हायपर टेन्सीव ड्रग या विषयावर पीएचडी मिळवली आहे.त्यांना प्राचार्य डॉ.अशोक भोसले यांचे रिसर्च गाईड म्हणून मार्गदर्शन लाभले तर शेठ गोविंद रघुनाथ साबळे काॅलेज ऑफ फार्मसी सासवड (जि.पुणे) येथे रिसर्च सेंटर होते.
सौ.नेहा काजळे यांनी पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील.संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील, प्राचार्य डॉ.अनिल भानवसे व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सभापती व सदस्य यांनी अभिनंदन केले.