आदर्श समाज भूषण पुरस्काराने प्रशांत माळवदे यांचा सन्मान

आदर्श समाज भूषण पुरस्काराने प्रशांत माळवदे यांचा सन्मान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 12/6/2025 : पंढरपूर येथे दैनिक नवमित्रच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त येथील रखुमाई सभागृहात आदर्श समाज भूषण पुरस्कारासह शाल, प्रमाणपत्र सन्मान चिन्ह,पुष्पहार देऊन प्रशांत माळवदे यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मराठी साहित्य परिषद पंढरपूर अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, मराठी पत्रकार संघाचे प. महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे, प्रा. नंदकुमार उबाळे, भाळवणीचे सरपंच रणजीत जाधव,संपादक सचिन माने, कार्य. संपादक राजेश शिंदे,उपसंपादक विठ्ठल जाधव,आदि मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशांत माळवदे यांचे सर्व स्तरातून कौतुकासह अभिनंदन केले जात आहे. नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन. यु. बी. सी. चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ चे प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी प्रशांत माळवदे यांचे अभिनंदन केले.