आपला जिल्हाताज्या घडामोडीधार्मिकप्रेरक

अकलूजची ग्रामदेवता श्री अकलाई देवीची यात्रा धार्मिक जल्लोषी वातावरणात संपन्न

अकलूजची ग्रामदेवता श्री अकलाई देवीची यात्रा धार्मिक जल्लोषी वातावरणात संपन्न

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 5/7/2023 : अकलूजची ग्रामदैवता श्री अकलाई देवीची यात्रा (भंडारा) विविध धार्मिक कार्यक्रमाने, भक्ती भावाने व उत्साहात संपन्न झाली.
ग्रामदेवता श्री अकलाई देवीची यात्रा परंपरेनुसार आषाढी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवार अथवा शुक्रवारी आयोजित करण्यात येत असते त्यानुसार मंगळवार (दि.4) रोजी दोन दिवसीय यात्रेचा प्रारंभ झाला.
नीरा नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात असलेल्या श्री अकलाई देवी मंदिरात कार्यकारी विश्वस्त जयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांतून देवस्थानचा परिसर उत्तम सुशोभीकरणाने सजलेला आहे. या परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईने तो अधिकच आकर्षक दिसत आहे.


यात्राकाळात मंदिर परिसरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्री अकलाई देवीची दुपारी 12 वाजताची मानाची पाकळ महापूजा विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील व सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, संग्रामसिंह मोहिते पाटील, स्वरूपराणी मोहिते पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दरवर्षी महिलांना श्रीदेवीचे दर्शन व नैवेद्य अर्पण करण्यासाठी खास दुपारी बारा ते तीन या वेळेत सोय करण्यात येते. सकाळी सहा पासून रात्री उशिरापर्यंत पुरुष व महिलांना दर्शनासाठी मंदिरात रांगेने सोडले जाते. दर्शनानंतर प्रत्येक भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येते. दर्शन व्यवस्था व प्रसाद वाटपासाठी शिवशक्ती नवरात्र मंडळ, सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज शहर मुस्लीम समाज, पगडीचा राजा प्रतिष्ठाण, छत्रपती गणेश मंडळ, कर्मवीर नवरात्र मंडळ, जैन समाज सन्मती सेवादल, वीरशैव समाज मंडळ, कर्मवीर तरुण मंडळ, बुरुड समाज युवक सेवा मंडळ, संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ, रत्नप्रभादेवी नवरात्र मंडळ व नगरपरिषद् सेवक वर्ग’ यांनी परिश्रम घेतले. पहाटेची पूजा विश्वस्त विशाल फुले व स्नेहल फुले यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी देवस्थानचे लक्ष्मण आसबे बाळासाहेब नारायण फुले तुकाराम ठेंगरे बाळासाहेब इंगळे उत्कर्ष शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री अकलाई देवीचा छबिना बुधवार दिनांक 6 रोजी अकलूज नगर फेरीसाठी निघणार असून रात्री उशिरा फुलेवाडा येथे पालखी आगामी वर्षाच्या यात्रेपर्यंत सन्मानपूर्वक ठेवण्यात येऊन यात्रेची सांगता होईल. श्रीदेवीच्या छबिनाप्रसंगी निघालेल्या पालखी सोहळ्याचे जागोजाग पायघड्या घालून स्वागत करून हळदी कुंकवाचा मान देऊन नारळाची तोरणे अर्पण करून स्वागत होत असते. देवीचे भक्त मंडळ भंडाऱ्याची उधळण करीत छबिण्याचा मनसोक्त आनंद लुटताना चे चित्र जागोजाग दिसत होते.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.