महिला बचतगट उत्पादित वस्तूंचे तालुकास्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शुभारंभ

महिला बचतगट उत्पादित वस्तूंचे तालुकास्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शुभारंभ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
🔰आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/02/2024 :
महिला बचतगट उत्पादित वस्तूंचे तालुकास्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शुभारंभ महिला प्रचंड प्रतिसादात झाला.
महिला आर्थिक विकास महामंडळ, माविम सोलापूर (महाराष्ट्र शासन अंगीकृत) अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान व महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास (नवतेजस्विनी) प्रकल्प या अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र यशवंतनगर व विठाई लोकसंचलित साधन केंद्र पंढरपूर यांच्या वतीने तालुकास्तरीय बचत गटातील महिलांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 ते 18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज या ठिकाणी चालणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन आ. राम सातपुते यांच्या हस्ते, आ. रणजितसिंह मोहिते पाटील,पं.स. माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत फित कापून, प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाले.
प्रदर्शनाच्या पहिल्या सत्रात महिलांच्या लेझीम संघाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले तर मुस्कान पठाण या युवतीने लावणीच्या विविध मुखड्यांवर विविध अदाकारीने लावणी नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. त्यामध्ये “राघू पिंजऱ्यात आला, मला म्हणतात हो पुण्याची मैना, अग बाय अग बाय अग बाय जानू विना रंगत नाय, टांगा पलटी घोडे फरार, रेशमाच्या रेघांनी लाल काळया धाग्यांनी” इत्यादी लावणी मुखड्यां चा लावणी नृत्यांमध्ये समावेश होता. शुभांगी नामदास या युवतीने “एकच राजा इथे जन्मला” गीत नृत्य सादर केले तर जयश्री एकतपुरे या यांनी “मेरे हातो मे नौ नौ चुडिया” या हिंदी चित्रपट गीतावर नृत्य सादरीकरण केले सर्वच महिला कलाकारांनी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला प्रेक्षकांची वाहवा आणि दाद मिळवली.
या प्रदर्शन व वस्तू विक्री महोत्सवाच्या निमित्ताने तालुकास्तरावर महिला बचतगटाने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीची कायमस्वरूपी सोय व्हावी, जिल्ह्यातील 11 फेडरेशन ला स्वच्छतागृह युक्त स्वतंत्र ऑफिस असावे इत्यादी महत्त्वपूर्ण मागण्या पुढे आल्या. याप्रसंगी बँक ऑफ इंडिया शाखाअकलूज व माळेवाडी यांच्या वतीने एका महिन्यात एक कोटी 25 लाख रुपयांचे कर्ज महिला बचत गटा साठी उपलब्ध करून प्रतिकात्मक धनादेशाचे वितरण आमदारांच्या हस्ते करण्यात आले.
तालुकास्तरीय प्रदर्शन व विक्री महोत्सवा करिता शासनाकडून पाच लाख रुपये निधी स्वरूपात आले असताना तसेच क्रीडा संकुल मध्ये आवश्यक जागा उपलब्ध असताना देखील प्रदर्शन व विक्री स्टॉलच्या उभारणी चे नियोजन अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे चुकीच्या पद्धतीने झाल्याने काही स्टॉल धारकांना फायदाच फायदा तर अन्य स्टॉल धारकांना तोट्याचा फटका बसणार आहे. याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्टॉल रचने च्या योग्य दिशा निर्देयाप्रमाणे स्टॉल उभारणी झाली असती तर त्याचा फायद फायदा सर्वांना आणि आयती प्रसिद्धी मिळू शकली असती याबाबत जाहीर भाषणात उल्लेख करून जिल्हा समन्वयकांसह संबंधित अधिकाऱ्यांना कान पिचक्या दिल्या.