ताज्या घडामोडी

‼️ कुतुबमिनार ची निर्मिती ‼️

‼️ कुतुबमिनार ची निर्मिती ‼️

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/01/2025 :
सर्वात सुंदर ऐतिहासिक वास्तू मध्ये ताजमहालचे नाव प्रथम घेण्यात येतं. मात्र, देशातील सर्वात उंच ऐतिहासिक वास्तू म्हटली की, कुतुबमिनार लगेच डोळ्यासमोर येतो.
कुतुब मिनार दिल्ली पासून दक्षिण दिशेला १८ किलोमीटर अंतरावर मेहरौली जिल्ह्यात जगप्रसिद्ध उंच मनोरा आहे. हा मनोरा पाहण्यासाठी जगातून अनेक पर्यटक येतात, तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा पर्यटक या मनोऱ्याला पाहायला येतात. प्रेक्षणीय स्थळ म्हणून कुतुब मिनार ला ओळखल्या जातं. कुतुब मिनार ची उंची ७२.५७ मीटर इतकी आहे, तळाचा व्यास १४.४२ मीटर आहे, तसेच वरील टोकाचा व्यास २.७५ मीटर इतका आहे. याचा पहिला मजला लाल पाषाणाचा असून त्यास बारा कोन आहेत. दुसरा मजला गोलाकार स्तंभाचा आणि तिसरा कोनांकित स्तंभाचा आहे. चौथा व पाचवा मजला संगमरवरी पाषाणात बांधण्यात आला आहे.
दिल्लीचा पहिला सुलतान कुतुबुद्दीन ऐबक याने या मशिद चे निर्माण केले होते. या मशिदेच्या जवळच कुतुब मिनार मनोऱ्याच्या बांधकामाला ११९९ ला सुरुवात झाली होती. या मनोऱ्याचे बांधकाम सुलतान कुतुबुद्दीन ऐबक ने सुरु केले होते. या मनोऱ्याला उभारण्यामागे कारण असे होते कि, या जवळच्या मशिदि मध्ये नमाज साठी तेथून सगळ्यांना आवाज देता येईल आणि सोबतच या मनोऱ्याला सुलतान कुत्बुद्दीन ऐबक चा प्रराक्रमाच्या विजयाचा स्तंभ म्हणून सुद्धा याची उभारणी केल्या गेली होती.
जोपर्यंत सुलतान कुतुबुद्दीन ऐबक जिवंत होता, तोपर्यंत कुतुब मिनार चा फक्त पहिला मजला बनला होता, त्यानंतर सुलतान कुतुबुद्दीन ऐबक चे १२१० ला निधन झाले, आणि नंतर दिल्लीच्या गादीवर नवीन सुलतान शम्सुद्दीन अल्तमश आला आणि त्याने मिनार चे पुढील काम पूर्ण केले, मिनार चे पूर्ण काम हे १२३० मध्ये झाले. यानंतर हि कुतुब मिनार च्या काही मजल्यांची दुरुस्ती केल्या गेली. फिरोज शाह तुघलक ने मिनार च्या चौथ्या मजल्याचे काम करून त्यावर पाचवा मजला सुद्धा चढविला, सोबतच त्याला वरच्या बाजूने गोल घुमट दिला. कुतुब मिनार चे पहिले तीन मजले तांबड्या आणि पिवळ्या रंगाची आहेत, आणि बाकीचे दोन संगमनेर च्या दगडांनी बनलेले आहेत, आणि तांबड्या रंगाच्या वाळूच्या दगडांनी बांधले आहे.

संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button