ताज्या घडामोडी
विचारधारा

विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 11/12/2025 :
शालेय जीवनात आपण आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकत असतो. आपल्यावर संस्कार करणारे आपले गुरुजन आपल्याला अनेक वाईट सवयीं पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
आपल्यामध्ये काही वाईट सवयी दिसल्या तर गोड बोलून त्या सोडण्यासाठी सांगतात. नाही ऐकले तर रागावतात, छड्या देतात, शिक्षा करतात. आपण चांगले व्हावे यासाठी ते आग्रही असतात.
पण मुलांनो, आपल्यातील अनेकांना त्यांची तळमळ कळत नाही. आपल्याला त्यांचा राग येतो. त्यांचे ऐकून स्वतः मध्ये बदल करण्या ऐवजी आपण त्यांच्या विषयीच तक्रार करतो. स्वतःच्या हाताने पायावर दगड मारून घेतो.
शालेय जीवनातील शिस्तच आपल्याला योग्य मार्ग दाखवते, ती पाळा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

