भारतीय सेनेत वर्षाला 1 लाख अग्नीवीर भरतीचा निर्णय
भारतीय सेनेत वर्षाला 1 लाख अग्नीवीर भरतीचा निर्णय
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 27/11/2025 :
भारतीय सेनेने अग्नीवीर योजनेअंतर्गत वार्षिक भरती दुप्पट करून एक लाखांपर्यंत नेली आहे. ही घोषणा केवळ एक धोरण नाही, तर राष्ट्राच्या भविष्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे. सध्या 45 ते 50 हजार वार्षिक भरती या योजनेअंतर्गत होते. 2025 पासून 1 लाख तरुणांना संधी देणारा हा निर्णय, सरकारच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे. 1.8 लाख सैनिकांच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या भारतीय सेनेसाठी हे एक उत्तम आणि आवश्यक पाऊल असून, या निर्णयामुळे पुढील चार वर्षांत 4-5 लाख तरुणांना भारतीय सेनेत सेवेची संधी मिळेल.
• या योजनेच्या विस्ताराने एक खूप मोठी प्रशिक्षित फौज राष्ट्रीय कर्तव्यांसाठी नेहमी तयार राहील.
• 0.5 फ्रंट लढाई कधी चिघळली, तर एक खूप मोठी प्रशिक्षित फळी ‘सिव्हीलीयन’ भागात मोर्चा सांभाळू शकते
• या निर्णयामुळे भारतीय सेनेचे सरासरी सैनिक वय 32 वरून 26 वर्षांपर्यंत खाली येईल. सैन्यासाठी हे महत्वाचे असते. हे तरुण विशेषतः ड्रोन, सायबर युद्धासाठी(ही) तयार केले जातील कारण ते टेक-सॅव्ही असतात.
• यामुळे होणाऱ्या वार्षिक 50000 कोटी रुपयांच्या पेन्शन बचतीतून शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञानाला चालना मिळेल.
• 17.5 ते 21 वर्षांच्या 10वी/12वी उत्तीर्ण तरुणांसाठी मासिक पगार ₹30000 पासून सुरू होईल जो चौथ्या वर्षी महिना ₹40000 पर्यंत वाढेल.
• अग्नीवीरांना ₹1 कोटी विमासुरक्षा, चार वर्षांनी ₹10-11 लाख सेवानिधी पॅकेज, कौशल्य प्रमाणपत्रे आणि उद्योजकतेसाठी कोणतेही कोलॅटरल न घेता ₹5-10 लाख कर्ज सुविधा मिळेल.
• यातील 25% सैनिकांना भारतीय सेनेत शामिल करून घेण्यात येईल तर उर्वरित 75% साठी केंद्रीय निमलष्करी दलांत (10% आरक्षण, 10000 जवान), रक्षा PSU मध्ये नोकऱ्या, राज्य पोलिस दलांत संधी (महाराष्ट्रात 10% कोटा जो 20% करण्यासाठी विचाराधीन आहे) आणि खासगी क्षेत्रात नोकऱ्या देण्यात येणार आहेत.
• इस्रायलच्या IDF सारखे (जे कॉन्स्क्रिप्शन मॉडेल किंवा पीपल्स आर्मी मॉडेल म्हणून ओळखले जाते) आणि अमेरिकन आर्मीचे (जे ऑल-व्हॉल्यून्टियर फोर्स AVF किंवा ‘शॉर्ट-टर्म एन्लिस्टमेंट मॉडेल’ म्हणून संबोधले जाते) यांच्याप्रमाणे, भारताचे हे अग्नीवीर मॉडेल आहे. अमेरिका व इस्रायल दोन्ही देशांमध्ये हे मॉडेल यशस्वी ठरले आहे.
सरकारच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत!
जय हिंद!🇮🇳
