पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर यांना “विदर्भभूषण पुरस्कार” जाहीर

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर यांना “विदर्भभूषण पुरस्कार” जाहीर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 14/11/2025 : यवतमाळ येथील श्री गुरुदेव प्रचारक पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर यांनी साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना विद्याभूषण फाऊंडेशन संस्था, नागपूर यांचा विदर्भभूषण पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. पुरुषोत्तम बैसकार यांचे द्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्यावर लेखन करुन वृत्तपत्रामधून प्रकाशित केले जाते.
विद्याभूषण फाऊंडेशन ही भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत एक सामाजिक व शैक्षणिक एनजीओ संस्था आहे आणि तिचा उद्देश देशात शांतता, एकता आणि सामाजिक सौहार्द वाढवते तसेच आर्थिक दृष्टया, दुर्बल घटकांना सामाजिक, शैक्षणिक उत्थान आणि रोजगार देणे आणि सामाजिक कार्यकर्तें संशोधकांना प्रोत्साहन देणे हे आहे. गुणगौरव व सत्कार करुन त्यांचे कार्य समाजासमोर आणणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
“पुरुषोत्तम बैसकार यांचे लेखन आमच्या साप्ताहिक अकलूज वैभव, पाक्षिक वृत्त एकसत्ता या प्रिंट मध्यमा बरोबरच aklujvaibhav.in आणि vrutteksattanewsblogspot.com या डिजिटल मीडिया मध्ये नियमित प्रसिद्ध होत असते त्यांना जाहीर झालेल्या विदर्भ भूषण पुरस्कारा निमित्त त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांची पुरस्कारासाठी योग्य अशी निवड केल्याबद्दल विद्याभूषण फाऊंडेशन संस्था, नागपूर यांचे दोन्ही माध्यमांचे संस्थापक संपादक आणि नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन यु बी सी चे प्रदेश उपाध्यक्ष तसेच प्रदेश संपर्क व प्रसिद्ध प्रमुख या नात्याने त्यांचे जाहीर आभार व्यक्त करीत आहे असे या निमित्ताने भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांनी म्हटले आहे.
