शिरीष ताराचंद फडे यांची गहिनीनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी निवड

शिरीष ताराचंद फडे यांची गहिनीनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी निवड
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/11/2025 : सद्गुरू गहिनीनाथ अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड अकलूजच्या अध्यक्षपदी माळीनगरचे ॲड. शिरीष ताराचंद फडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सद्गुरू गहिनीनाथ अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बँकेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक (सहकारी संस्था)पी. आर. सारडा होते. त्यांच्या देखरेखीखाली निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी ॲड. शिरीष फडे यांची निवड झाल्याबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. फडे यांनी यापूर्वी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून २० वर्षे कामकाज पाहिले आहे. या निवडीप्रसंगी सन्मती सोनाज, डॉ. विठ्ठल कवितके, अजितकुमार गांधी, भरतेश वैद्य, नीलेश गिरमे, रमेश तोरणे, प्रभावती काळे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे, राहुल देशपांडे, कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.

