मनाची शुद्धता

मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 01/11/2025 :
सद्य परिस्थितीत स्त्रियांचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. नोकरी-व्यवसाया निमित्त रात्री अपरात्री, वेळ काळाच्या बंधनात न अडकता देश-परदेशात एकटीने फिरावे लागते.
कितीही सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला तरी त्या अत्याचाराला बळी पडतात. कधी नोकरीच्या ठिकाणी तर कधी प्रवासात. स्त्रियांची वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून सरकारने काही सोयी केल्या आहेत.
महिलांनी “त” म्हणता “ताक” ओळखायला शिकले पाहिजे. कोणत्याही मोह-मायाजालात न अडकता स्वतःला सुरक्षित ठेवले पाहिजे. प्रवास सुरू करण्यापूर्वीच ज्या गाडीने प्रवास करणार त्या गाडीच्या नंबर व ड्रायव्हरचा एक फोटो काढावा. आपल्या घरच्यांना live location व तो फोटो पाठवावा.
आजचा संकल्प
आपले संरक्षण आपणच करण्यासाठी महिलांनी स्वतःला सक्षम बनवले पाहिजे हे लक्षात ठेवून आपण महिला स्वसंरक्षणाचे धडे घेऊ व समाजात सुरक्षितपणे वावरू._
सौ. स्नेहलता स. जगताप.

