सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस संपन्न”

“सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस संपन्न”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 31/10/2025 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरी करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालय समन्वयक, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थांच्या हस्ते डॉ. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी विभागातील विद्यार्थिनी कु. संचिता सुळे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देवून त्यांच्या महान कार्याची थोडक्यात माहिती देताना सांगितले कि सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील संस्थानांना एकत्रित करून अखंड भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणले ते एक थोर सामाज सुधारक होते.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. भारती चंदनकर व सूत्रसंचालन म्हणून कु.मांजरे ईश्वरी व कु.अनुजा पिसे यांनी काम पाहीले.

