ग्राहक समिती तर्फे पूरग्रस्त भागातील महिलांना साडी वाटप

ग्राहक समिती तर्फे पूरग्रस्त भागातील महिलांना साडी वाटप
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 24/10/2025 :
सीना नदीला आलेल्या पुरात नदीकाटच्या लोकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.
त्यामुळे पूरग्रस्त पिरटाकळी,ता. मोहोळ,जि. सोलापूर येथील महिलांना दिवाळी भाऊबीज निमित्त ग्राहक समिती तर्फे साडीचे वाटप करण्यात आले.
ग्राहक समिती प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड हें अध्यक्ष स्थानी होते.
प्रेस न्यूज मीडियाच अध्यक्ष बाळासाहेब पारवे यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. जि. अध्यक्ष संतोष कोल्हाळ यांनी आपले विचार व्यक्त केले.
जि. उपाध्यक्ष पप्पू घोडके, ता. उपाध्यक्ष सुभाष जाधव शाहीर, कवी भारत कदम,हें उपस्थित होते.
हनुमंत खलसोडे, नवनाथ कदम, हनुमंत कदम, उदय कदम, गणेश थिटे, बालाजी धुमाळ, बाजीराव जगताप यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते गावकरी उपस्थित होते.

