ताज्या घडामोडी
जगाचा पोशिंदा

जगाचा पोशिंदा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 09/10/2025 :
तू जगाचा पोशिंदा,
तुच सर्वेसर्वा आहेस,
पोर नसले मी शेतकऱ्यांची,
तरी जाण तुझ्या कष्टाची….१
निसर्गाच्या मनावर चाले,
गणित तुझे शेतीचे,
कधी सुटते, कधी अडते,
कधी फायदा, कधी तोट्याचे….२
होऊ नकोस हताश तू,
कर नवी सुरुवात पुन्हा,
निसर्गावर मात करशील,
वापर करूनी बुद्धीचा…..३
निरनिराळ्या पिकांसाठी,
वापर नवे तंत्रज्ञान,
तूच आहेस संशोधक,
निसर्गाचा खरा राजा महान…४
खरा अन्नदाता तूच तू,
असा हरलास तर ,
कोण पिकवेल अन्न पुन्हा,
तूच आहेस जगाचा पोशिंदा खरा!…५ 🌾

✍️ सौ.@ धनश्री मनोज म्हेत्रस,राहू

