ताज्या घडामोडी

अकलूज नगर परिषद निवडणूक उमेदवार चर्चा आणि सत्कार

अकलूज नगर परिषद निवडणूक उमेदवार चर्चा आणि सत्कार

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 09/10/2025 :
गांधी चौक, अकलूज येथील 1070 झोपडपट्टी रहिवासी यांच्या वतीने माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचा सत्कार करण्यात आला.
गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गिरीष शेटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, अजय बाळू वाघमोडे, नागेश सुखदेव जाधव, बापू दत्तू मोहिते, गणेश सुनील साळुंखे, आयान सय्यद, प्रेम मारुती बोडरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अकलूज नगरपरिषद निवडणुकीत प्रभागवार इच्छुक उमेदवारांची यावेळी चर्चेतून चाचपणी करण्यात आली.
वाढदिवस संपन्न

सत्कारानंतर समतानगर अकलूज येथील रहिवासी अविनाश उत्तम जगताप यांच्या 32 व्या वाढदिवसा निमित्त गिरीष शेटे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देत वाढदिवस केक कापण्यात आला. ॲड. शरफू मलिक शेख, पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यानीही अविनाश जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान केला. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन निलेश पगारे यांनी केले.

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button