प्लास्टिक कचरा उघडयावर टाकू नये – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन
प्लास्टिक कचरा उघडयावर टाकू नये – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
पंढरपूर दि.29:- पंढरपूर शहरात सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. जमिनीवर टाकलेले प्लास्टिक पावसाच्या पाण्यासोबत वाहून नेले जाते. सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी, नाले यामध्ये हे प्लास्टिक अडकून राहते त्यामुळे. शहरात पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून राहण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. पंढरपूर शहरातील नागरिकांनी कचरा, प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स, थर्माकोल, कागद आदी वस्तू उघड्यावर टाकू नये असे, आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
शहरात फुटपाथवरील दुकाने, हातगाड्या, फिरते व्यावसायिक, फळविक्रेते, काही नागरिक तसेच गटारीलगत राहणारे व व्यवसाय करणारे लोक अनेकदा कचरा थेट गटारांमध्ये किंवा उघड्यावर टाकतात. परिणामी गटारे तुंबून पावसाळ्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोठ्या मेहनतीने तो कचरा साफ करून गटारे सुरळीत करण्याचे काम करावे लागते.शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छतेत सहभाग घेतला पाहिजे.
नागरिकांनी घरातील व व्यावसायिक कचरा फक्त घंटागाडीतच द्यावा,. घंटागाडी वेळेवर न आल्यास कचरा घरात /दुकानात सुरक्षित ठेवावा व नंतर घंटागाडीतच द्यावा,कोणत्याही परिस्थितीत गटारात किंवा रस्त्यावर कचरा टाकू नये.आपल्या परिसरात स्वच्छतेबाबत सतर्क राहून लहान मुलांना देखील याचे संस्कार द्यावेत. स्वच्छता ही सेवा असून हा संस्कार आहे. शहरातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक घर, प्रत्येक दुकानदार व व्यावसायिकांनी या बदलाचा भाग व्हावे, एकत्रित प्रयत्नांमुळेच आपले पंढरपूर स्वच्छ, सुंदर आरोग्यदायी होऊ शकेल. असे आवाहनही नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000000