माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हिंदीची व्याप्ती वाढत आहे : डॉ.मालोजी जगताप

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हिंदीची व्याप्ती वाढत आहे : डॉ.मालोजी जगताप
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22/09/2025 :
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सांगोला महाविद्यालयातील हिंदी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.मालोजी जगताप होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.शिवप्रसाद टिळेकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते पाटील व श्रीमती कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे डॉ.मालोजी जगताप यांनी हिंदी भाषेचे महत्व, हिंदी बरोबरच विदेशी भाषेचे व मातृभाषेचे महत्व, AI चा सुयोग्य वापर, कॉम्प्युटर क्षेत्रात वाढता हिंदीचा प्रभाव, आधुनिक युगातील विद्यार्थ्यांचे भविष्य तसेच मध्ययुगीन इतिहासामधील हिंदीचे महत्व आदी विषयांवर विविध दाखले देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो.डाॅ.शिवप्रसाद टिळेकर यांनी हिंदी येणाऱ्या काळात अंतर्राष्ट्रीय भाषा म्हणून ओळखली जाईल असा आशावाद व्यक्त केला. तसेच हिंदी ही जगात तिसऱ्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे त्यामुळे हिंदी ही महत्वाची भाषा आहे असा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हिंदी आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अतिशय महत्त्वाची भाषा बनत आहे असंही ते म्हणाले.
हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी विभागाच्या वतीने महाविद्यालयात हिंदी दिवस सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध स्पर्धांचे निकाल वाचन करुन बक्षिस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा प्रतियोगिता, शेरो- शायरी प्रस्तुतीकरण प्रतियोगिता, हिंदी फिल्मी डायलॉग प्रस्तुतीकरण प्रतियोगिता, जाहिरात प्रस्तुतीकरण प्रतियोगिता व पोष्टर प्रदर्शनी प्रतियोगिता या पाच स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये एकूण १७० विद्यार्थींनी सहभाग घेतला.
*सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा प्रतयोगिता मध्ये प्रथम क्रमांक – सृष्टी पवार, बी.ए.भाग 3, द्वितीय क्रमांक – गौरी गौड, बी.ए.भाग 3,
तृतीय क्रमांक – दीक्षा पवार, बी.ए.भाग 3
*शेरो-शायरी प्रस्तुतीकरण प्रतियोगिता मध्ये प्रथम क्रमांक – गौरी लोंढे, बी.ए.भाग – 2, द्वितीय क्रमांक विभागून- राजू देवकर, बी.कॉम.भाग – 2 व मुस्कान सय्यद, बी.ए.भाग – 2, तृतीय क्रमांक विभागून – श्रावणी ढगे, बी.कॉम.भाग – 3, व शिवमंगल कश्यप, बी.ए.भाग – 1.
*फिल्मी डायलॉग प्रस्तुतीकरण प्रतियोगिता मध्ये प्रथम क्रमांक – श्रावणी ढगे, बी.कॉम.भाग – 3,
द्वितीय क्रमांक – मोहिनी तुपे, बी.ए.भाग – 3, तृतीय क्रमांक – निसर्गा मगर, बी.ए.भाग – 2
*विज्ञापन प्रस्तुतीकरण प्रतियोगिता मध्ये प्रथम क्रमांक – दिव्या गिरी बी.ए.भाग – 2, द्वितीय क्रमांक विभागून – गौरी लोंढे, बी.ए.भाग – 2, व फायेजा तांबोळी, बी.ए.भाग – 3, तृतीय क्रमांक विभागून – सुजित चव्हाण, बी.ए.भाग – 3, व साहिल भिवरकर, बी.ए.भाग – 2.
*पोस्टर प्रदर्शनी प्रतियोगिता मध्ये
प्रथम क्रमांक – धनश्री काथवटे, बी.ए.भाग – 1, द्वितीय क्रमांक – प्रीती कांबळे, बी.ए.भाग – 2,
तृतीय क्रमांक – शिवानी वाघ, बी.ए.भाग – 1 या सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवले. बक्षीस प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प व प्रथम क्रमांकास गोल्ड, द्वितीय क्रमांकास सिल्वर व तृतीय क्रमांकास ब्राँझ मेडल प्रदान करण्यात आले. या स्पर्धांचे परीक्षण प्रा.विनायक सूर्यवंशी, डॉ.रवींद्र माने, डॉ.अण्णासाहेब नलवडे, प्रा.स्मिता पाटील, डॉ.उर्मिला कोडग, डॉ. सविता सातपुते, तसेच सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा स्पर्धेचे परीक्षण डॉ.विजयकुमार शिंदे व डॉ.उत्तम वाघमोडे यांनी केले.
कार्यक्रमांचे प्रस्ताविक श्रावणी ढगे, प्रमुख पाहुण्यांचा परिचय सुजित चव्हाण यांनी करुन दिला. तसेच तमन्ना तिकोटे, दिव्या गिरी, संध्या गायकवाड व विशाल खरात या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी लोंढे हिने केले. शेवटी सर्वांचे आभार फायेजा तांबोळी या विद्यार्थींनीने व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ.अण्णासाहेब नलवडे, डॉ.उर्मिला कोडग, डॉ.पल्लवी मिसाळ, प्रा.नयना यादव आदी प्राध्यापिका-प्राध्यापक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हिंदी विभागातील सर्व विद्यार्थी, डॉ.विजयकुमार शिंदे, डॉ.उत्तम वाघमोडे आणि हिंदी विभाग प्रमुख डॉ.निवृत्ती लोखंडे, रजिस्ट्रार राजेंद्र बामणे, अधिक्षक युवराज मालुसरे, अब्दुल नदाफ यांनी परिश्रम घेतले.