⭕ जरांगे फॅक्टरः आव्हान मंडल आयोगाला? 🟪(भाग-4) ओबीसीनामा-47
🅾️ पीछवाडा चमकावणारा काजवा आव्हान देतोय सुर्याला!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 19/09/2025 :
कोणतीही सार्वजनिक कृती अथवा आन्दोलन पुरोगामी आहे की प्रतिगामी, क्रांतिकारक आहे की प्रतिक्रांतिकारक हे ठरविण्यासाठी चार कसोट्या असतात, हे मी मागच्या भागात स्पष्ट केले आहे. आता याच कसोट्या वापरून जरांगेचं मराठा आरक्षणाचे आन्दोलन प्रतिगामी आहे की पुरोगामी, प्रतिक्रांतिकारक आहे की क्रांतिकारक ते ठरवू या! एक महत्वाची बाब आधीच स्पष्ट करतो की, मी तयार केलेल्या कसोट्या अंतिम नाहीत. त्यात कोणी बदल सूचविला अथवा नवी किंवा नव्या कसोट्या कुणी सूचविल्यात तर त्याही कसोट्यांचा आपण विचार करू या!
मी पहिली कसोटी सांगीतली की, एखाद्या सभेच्या स्टेजवर अथवा आन्दोलन स्थळी कुणाचे फोटो अथवा मुर्त्या ठेवलेल्या आहेत, त्यावरुन आन्दोलन प्रतिगामी आहे की पुरोगामी हे प्राथमिक दृष्ट्या ठरविता येते. याचे उदाहरण मी दिले होते. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार, राम मनोहर लोहिया, बुद्ध, मार्क्स, लेनिन हे जागतिक स्तरावरचे मान्यता पावलेले पुरोगामी अथवा क्रांतिकारक आहेत. त्यामुळे या महापुरूषांपैकी एक किंवा जास्त फोटो लावलेले असतील तर ते आन्दोलन पुरोगामी अथवा क्रांतिकारक असल्याचे प्रथम दर्शनी दिसते. जरांगेच्या कोणत्याच आन्दोलनात वरीलपैकी एकही महापुरूषाचा फोटो नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आन्दोलन स्थळी होता. शिवाजी महारांजांचा फोटो अथवा पुतळा कार्यक्रमात ठेवणारे तीन प्रकारचे लोक असतात. आता महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शत्रूभावी तीन दृष्टिकोनातून मांडला जातो. 1) ब्राह्मणी इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांना मुसलमानविरोधी व गो-ब्राह्मण प्रतिपालक म्हणून मानतात. तर 2) अ-ब्राह्मणी इतिहासकार छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्रादिअतिशूद्रांचा राजा, रयतेचा राजा, कुळवाडी कुळभूषण, पोशिंदा कुणब्यांचा म्हणून मानतात. 3) मराठा जातीच्या प्रत्येक जात-कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अथवा मुर्ती असते. मराठा जातीच्या कार्यक्रमात मराठा लोकांना हे सांगायचे असते की आम्ही मराठा जातीचे आहोत व आमच्या जातीचा राजा म्हणून आम्ही येथे छत्रज्ञती शिवाजी महाराजांचा फोटो लावतो किंवा मुर्ती ठेवतो आहोत. मराठा जातीच्या दृष्टीने शिवाजी राजे हे पुरोगामी आहेत की प्रतिगामी आहेत, याचं त्यांना काहीही घेणं-देणं नसते. फक्त जातीचा राजा म्हणून ते जातीच्या कार्यक्रमात फोटो लावतात अथवा मुर्ती ठेवतात. ज्या प्रमाणे माळी लोक जातीच्या मिटिंगांमध्ये तात्यासाहेब महात्मा फुलेंचा फोटो लावतात. त्यातून माळ्यांना हेच सांगायचे असते की, तात्यासाहेब महात्मा फुले हे जातीच्या विरोधात होते, हे आम्हाला सांगू नका, आम्ही माळ्यांच्या कार्यक्रमात महात्मा फुलेंचा फोटो लावतो कारण ते माळी होते. ते पुरोगामी होते की प्रतिगामी हे आम्हाला सांगू नका. असे बेशरम लोक प्रत्येक जातीत असतात व त्यांना आपापल्या जातीच्या संत, महापुरूष व महात्म्यांना विकून धंदा फक्त करायचा असतो.
जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणून मानतो? पुरोगामी म्हणून की प्रतिगामी म्हणून, मुसलमानविरोधी, गो-ब्राह्मण प्रतिपालक म्हणून की शद्रदिअतिशूद्रांचा, रयतेचा राजा म्हणून? जर जरांगे पुरोगामी छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती आंदोलन स्थळी लावत असेल तर शिवाजी महाराजांच्या मुर्ती शेजारी इतर पुरोगामी महापुरूषांचे फोटो अथवा मुर्त्या दिसल्या असत्या. याऊलट जरांगे तेथे महाराजांच्या शेजारी गणपतीची मुर्ती ठेवतो. ज्या शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात कधीही गणपतीचं ‘थोबाड’ बघीतलं नाही व कधी सत्यनारायणही केला नाही, त्या विज्ञानवादी महाराजांच्या शेजारी गणपती बसविण्याचा अट्टहास का? ज्या गणपतीला तात्यासाहेब महात्मा फुलेंपासून प्रबोधनकार ठाकरेंपर्यतच्या महापुरूषांनी व जेधे-जवळकरांपासून प्रविण गायकवाड-शरद पवारांपर्यंतच्या मराठा जातीतील विद्वानांनी व नेत्यांनी विरोध केलेला आहे, त्या गणपतीचा अट्टहास का? याचा साधा-सरळ अर्थ हा होतो की, जरांगेचं हे आन्दोलन ब्राह्मणवादी संघ-भाजपाच्या छुप्या वैचारिक पाठींब्याने सुरू आहे. ब्राह्मणी गणपतीची मुर्ती ठेवल्याने हे आंदोलन संघप्रणित आहे. आणी मराठा जातीच्या आंदोलनात शिवाजी महाराजांची मुर्ती ठेवल्याने हा कार्यक्रम तिसर्या प्रकारातील ‘मराठा जातीयवादी’ आहे.
आता यावर सुरेश खोपडेंसारखे पुरोगामी पोलीस अधिकारी लगेच म्हणतील की, जरांगे फडणवीसांना शिव्या देतो म्हणजे तो ब्राह्मणशाहीविरोधात लढतो आहे. ब्राह्मणशाहीविरोधात लढणे म्हणजे फक्त एखाद्या ब्राह्मणाला शिव्या देणं, किती सोपं काम आहे खोपडेसाहेब! उगाच तात्यासाहेब-बाबासाहेबांनी ब्राह्णशाहीविरोधात लढण्यासाठी आपले सगळे आयुष्य झिजवले व मोठ-मोठे ग्रंथ लिहीलेत. उगाच सामी पेरियारांनी ब्राह्मणशाहीला गाडण्यासाठी सशोधन करून ‘सच्ची रामायण’’ लिहीले, एखाद्या ब्राह्मणाला चार-दोन शिव्या दिल्यावर पेशवाई सहज नष्ट करता येते, उगाच त्या 500 महार सैनिकांनी 1818 साली प्राण धोक्यात घालून पेशवाई गाडली. त्या काळी जरांगे असता तर अंतरवली सराटीत बसूनच 5-6 शिव्या देउन सहजपणे पेशवाई संपवली असती व 500 महार सैनिकांचे जीव वाचवले असते. अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. आणखी 2-4 शिव्या देऊन फडणवीस व त्यांची पेशवाई भस्मसात करता येईल, पण खोपडेसाहेबांनी जरांगेला का रोखून धरले आहे, काही कळत नाही.
दुसरी कसोटी आहे नेतृत्वाची! ज्या सभेचं अथवा आंदोलनाचं नेतृत्व संविधानमान्य पुढारलेल्या जातीची माणसं करीत असतील तर ते आंदोलन निश्चितच मागास जातींच्या हिताविरोधात व कष्टकर्यांच्या विरोधात आहे. ज्या प्रमाणे भांडवलदार कामगारांच्या हितासाठी मोर्चा काढू शकत नाहीत, त्याचप्रमाणे संविधानमान्य पुढारलेल्या ब्राह्मण-क्षत्रिय(मराठा)-वैश्य जाती दलित-आदिवासी-ओबीसी मागास जातींच्या हितासाठी कधीच आंदोलन करू शकत नाहीत.
तिसरी कसोटी आहे, या कार्यक्रमात कोणते मुद्दे वा विचार मांडले जात आहेत? जरांगेच्या तोंडातून रोज काय काय मुक्ताफळे ओकली जातात हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो. रोज सकाळी उठल्या-उठल्या पुढच्या बाजूने शौचास करीत असतो. सकाळी-सकाळी भुजबळसाहेबांना चार-दोन शिव्या दिल्याशिवाय जरांगेचं पोट साफ होतच नाही. या शिवाय या आंदोलनात त्याने व्यक्त केलेली तत्वज्ञाने, व विचार भल्या-भल्या अभ्यासू विद्वानांना आत्महत्त्या करायला लावणारी आहेत. त्याची काही उदाहरणे-
1) दलित-आदिवासी-ओबीसी हे लायकी नसलेले लोकं आहेत, आरक्षणामुळे आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांना त्यांच्या हाताखाली काम करावे लागते. ही बाब मराठा जातीसाठी शरमेची आहे. मराठ्यांना ओबीसी बनवून जरांगेला ना-लायक व बे-अकली होण्याची किती घाई झालेली आहे?
2) 1994 साली शरद पवारांनी फक्त एका ओळीचा जी.आर. काढून ओबीसींना आरक्षण दिले. याच्यावर शरद पवार कधीच तोंड उघडणार नाहीत, कारण ‘लाडका मराठा’ म्हणून जरांगे शरद पवारांच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे.
3) जर तुम्ही आमच्या जी.आर. ला आव्हान दिले तर आम्ही मंडल आयोगाला आव्हान देउ! अकलेचे तारे किती तोडायचे यालाही काही मर्यादा असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून जन्मलेला मंडल आयोग, केन्द्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ञांचा मंडल आयोग, ओबीसींच्या चार पिढ्यांनी आंदोलने करून कष्टाने मिळविलेला मंडल आयोग, केन्द्र शासनाने मंजूर केलेला मंडल आयोग, सुप्रिम कोर्टाच्या पूर्ण पीठाने म्हणजे सर्वच्या सर्व न्यायधिशांनी वैध ठरविलेला मंडल आयोग, 1990 चे व त्या नंतरची सर्व केन्द्र सरकारे व राज्य सरकारे बिनदिक्कतपणे राबवित असलेला मंडल आयोग, अशा मजबूत व भक्कम पायावर उभा असलेल्या मंडल आयोगाला जरांगे नावाचा अडाणी व अज्ञानी आव्हान द्यायला निघालेला आहे. महाराष्ट्र सरकारने हातात दिलेला चार ओळीचा जी. आर. समजून घेण्यासाठी जरांगेला चार विद्वान शेजारी बसवावे लागतात. आणी हा येडा चालला संविधानाला व सुप्रिम कोर्टाला आव्हान द्यायला! पीछवाडा चमकाविणारा काजवा सुर्याला आव्हान द्यायला निघालेला आहे.
असे अनेक तत्त्वद्यानाचे सिद्धांत जरांगे रोज मांडत असतो व सूज्ञ लोकांचे मनोरंजन करीत असतो. लेखाच्या पुढील भागात हैद्राबादी गॅझेट निजामांच्या औलादींचा समाचार घेऊ,
तो पर्यंत जयजोती, जयभीम, सत्य कि जय हो!
प्रा. श्रावण देवरे,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्क नंबर- 81 77 86 12 56 किंवा 75 88 07 2832