✅ मनाची शुद्धता

✅ मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/09/2025 :
अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्याचा प्रकार आहे. या पदार्थांचे सततचे सेवन केल्याने व्यसन लागते. व्यसनाधिनता वाढली की मनुष्य पूर्णपणे त्यामध्ये अडकतो.
तंबाखू, सिगारेट, अफू, गांजा, दारू, वगैरे नशा आणणारे पदार्थ माणसांचे वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक आयुष्य बरबाद करतात. व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबियांना समाजात अपमानित वाटते. त्या कारणाने त्यांचा सामाजिक दर्जा पण खाली येतो.
व्यसनी व्यक्तीच्या लक्षात आले नाही तरी त्याला व त्याच्यामुळे अप्रत्यक्षरित्या अनेकजणांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्याची कार्यक्षमता कमी होते. शारीरिक व्याधी सुरू होतात. अशा व्यक्ती अल्पायुषी ठरतात.
आजचा संकल्प
मोठ्यांचे अनुकरण करत तरुण पिढी पण व्यसनांच्या आहारी जाऊ शकते हा धोका ओळखून मोठ्यांनी व्यसनापासून दूर राहून तरुण पिढी निर्व्यसनी राहील यासाठी प्रयत्नशील राहू._
सौ. स्नेहलता स. जगताप