⭕ मराठी माणसा संडासा जवळुन उठ आणि ****
⭕ मराठी माणसा संडासा जवळुन उठ आणि ****
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 20/9/2025 :
कोकण रेल्वे मार्गावर जेव्हा 40 गाड्या धावत होत्या तेव्हा आम्ही एडवोकेट संजय गांगनाईक, डिके सावंत सह मी जादा सावंतवाडी गाडी सोडण्याबाबत पत्रव्यवहार केले .अधिकाऱ्यांना भेटलो . सगळ्यांचे उत्तर एकच होतं चाळीस गाड्या व्यतिरिक्त एकही गाडी एकेरी मार्गावरून सुरू करता येत नाही.
मात्र त्यानंतर 15 जागा गाड्या पर प्रांतात धावणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरून सुरू झाल्या मात्र सावंतवाडी गाडीला हिरवा सिग्नल दिला नाही. मात्र उधना मेंगलोर एरनाकुलम त्रिवेदम कोचिवली अशा न मागता गाड्या देण्याचा सपाटा लावून पंधरा गाड्या पर प्रांतामध्ये सुरू केल्या . 55 गाड्या सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावत आहे पैकी 30 गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत . याची आम्हाला चीड का येत नाही? दक्षिण भारतातल्या लोकांचा चार तासाचा प्रवास वाचला त्यातली वीस मिनिटे फक्त रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग जिल्ह्याला द्या महाराष्ट्राला द्या अशी माझी मागणी आहे. चुकीची आहे का?
आणि आमचा कोकणी माणूस मराठी माणूस संडासा जवळ बसून बायका मुलांसह रात्रभर प्रवास करत आहे याची आम्हाला चीड का येत नाही? गणपती मे महिन्यामध्ये निवडणुका जवळ असल्या की स्वतंत्र गाड्या मोफत सोडून आम्हाला लाचार का बनवता ?आमच्याकडे पैसे आहेत आम्ही तिकीट काढून जाऊ शकतो फक्त गाडी सुरू करा .बांद्रा मडगाव कोणी मागितली होती आम्हाला बांद्रा सावंतवाडी हवी होती 22 टक्के वाटा उचलला आम्ही मग आम्हाला 22 टक्के गाड्या का नाहीत? 22 टक्के टर्मिनस का नाही ?सावंतवाडी टर्मिनस साठी 422 कोटीचा निधी पाहिजे आमचे लोकप्रतिनिधी झोपलेत काय अरे उठा मराठी माणसाने संडासाजवळ बसून प्रवास करण्याची वेळ संपलेली आहे.
आता आणखीन एक बातमी कानावर येत आहे यापूर्वी युपी बिहार करता पटना वास्को गाडी होती आता नवीन एक गाडी बिहार साठी सोडण्यात येत आहे
०७३११/०७३१२ वास्को मुझफ्फुरनगर
या गाडीची कोणतीही मागणी नसताना फक्त उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना कोकणामध्ये मोल मजुरीसाठी येण्यासाठी न मागता ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे.
आणि आता त्या गाडीला एक्सटेंशन करण्यात येत आहे आणि आम्ही वसई सावंतवाडी ,कल्याण सावंतवाडी ,पुणे सावंतवाडी (खरे म्हणजे पुणे एरणाकुलम गाडी सावंतवाडीसाठी होती परंतु टर्मिनस नसल्यामुळे ती गाडी पुढे एक्सटेन्शन करण्यात आली ही गाडी सुरू करताना एडवोकेट संजय गांगनाईक आम्ही एकत्रच काम करत होतो आजही करत आहोत.)
अशा गाड्यांची मागणी करत आहोत तर त्या गाड्या आम्हाला मिळतका नाहीत ?
मोठी मागणी सोडा एक छोटीशी मागणी दिवा सावंतवाडी गाडी संध्याकाळी आठ वाजता सावंतवाडी वरून दिव्याला पोहोचल्यानंतर रात्रीच्या प्रवासाला पुन्हा ती अकरा वाजता सोडण्यासाठी एक रेक उपलब्ध करावा आम्हाला स्लीपर नको चेअरकार प्रमाणे बसून जाण्याचा प्रवास जरी असेल तरी आम्ही आनंदाने जाऊ शकतो वंदे भारत तेजस सारख्या गाड्या कोकणी माणसाला परवडणाऱ्या नाहीत. त्याऐवजी त्याच वेळेला एक जनशताब्दी रत्नागिरी पर्यंत रात्री दहा वाजता जरी दादर वरून सोडली किंवा पनवेल वरून सोडली किंवा वसई वरून सोडली तरी आम्ही खुश आहोत.
उठा आणि आपल्या लोकप्रतिनिधींना जागे करा सावंतवाडी टर्मिनस सुरू करा 422 कोटीचा निधी घेऊन या टर्मिनस पूर्ण करा आणि मधू दंडवते यांचे नाव सावंतवाडी टर्मिनस ला द्या. पनवेल टर्मिनस सुरू होत आहे त्याला स.का. पाटलांचे नाव द्या. परेल टर्मिनस पूर्ण होत आहे तेथे बाबासाहेबांचे मोठे कार्य आहे त्याला चैत्यभूमी टर्मिनस असे नाव द्या.
आम्हाला चिड का येत नाही? उडपी मधील लोकांनी विधानसभेमध्ये दबाव आणून उडपी स्टेशनचे नाव “श्रीकृष्ण उडपी “असे ठेवण्यास ठराव मंजूर केला विधानसभेमध्ये .कारण कनक दासाचे श्रीकृष्ण मंदिर उडपी मधील प्रसिद्ध आहे.
कोकण कन्या चा भार कमी व्हावा म्हणून सुरू केलेली मराठी माणसांसाठी मुंबई कारवार गाडी कर्नाटकच्या लोकांनी मेंगलोर पर्यंत वाढवून नेली. कारवारच्या पुढे सहा ठिकाणी ती थांबते आणि सावंतवाडीला मागणी करून सुद्धा ती थांबत नाही. कारवारच्या मराठी माणसावरती अन्याय केला तरीही आम्ही शांत. मग आमच्या लोकप्रतिनिधींना काय लाज वाटते मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी टर्मिनस ला देण्यासाठी अहो मुख्यमंत्री (तेव्हा सुद्धाफडणवीस साहेब होते) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू स्वतः येऊन अकरा वर्षांपूर्वीआपल्या नावाचा दगड लावून जातात त्या दगडाची पुन्हा पूजा केव्हा होणार? सावंतवाडी टर्मिनस केव्हा सुरू होणार? मी पुन्हा येईन म्हणालात ना, आलात ना ,मग सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करा त्यासाठी सुद्धा तुम्हाला जनतेने मुख्यमंत्री बनवले असणार असे समजा.
कल्पना आवडली असेल तर शेअर करा लाजू नका प्रसिद्ध करा आणि इतर लेख वाचण्यासाठी माझे नाव गुगल वर सर्च करा गुगलने माझ्या लेखाची नोंद घेतली परंतु मध्य रेल्वे कोकण रेल्वे घेत नाही. नाही म्हणायला यावर्षी थॉम्बीयस नावाचे एक परिचलन अधिकारी यांना मी गणपतीसाठी सुटणाऱ्या ज्यादा गाड्या मुंबईवरून जाताना गणपतीचे पहिले सहा दिवस जाणाऱ्या गाड्यांनाअग्रक्रमाने प्राधान्य द्या व येणाऱ्या गाड्या थांबवून ठेवा व यथावकाश येणाऱ्या गाड्यांना लेट झाला तरी चालेल जाणाऱ्या गाड्या वेळेवर जाऊ द्या व सहा दिवसानंतर येणाऱ्या गाड्यांना प्राधान्य द्या ही कल्पना त्यांना खूपच आवडली व त्यांनी ती स्वीकारली यामुळे यावर्षी गाड्या लेट झाल्या नाहीत अपवादात्मकच गाड्या लेट झाल्या. त्याबद्दल थॉबिंयस साहेबांची मी आभार मानतो.
सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर
संस्थापक सदस्य कोकण रेल्वे
940 41 356 19