ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील १३ शिव- पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त -तहसीलदार सचिन लंगुटे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील १३ शिव- पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त
-तहसीलदार सचिन लंगुटे

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
पंढरपूर (दि.२०) – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा राबवला जात आहे. या सेवा पंधरवडा मध्ये तालुक्यातील गावागावातील शिव-पानंद रस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याची मोहीम सुरू असून, तालुक्यातील वरील 13 अतिक्रमित शिव रस्ते ,पाणंद रस्ते खुले करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
या अभियानांतर्गत तालुक्यातील पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करणे, शिव-पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, रस्ता अदालत आयोजित करुन शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, तसेच शेत रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे आदी कामे केली जात आहेत. पंढरपूर तालुक्यातील १३ अतिक्रमित ११.५ कि.मी लांबीचे शिव-पाणंद रस्ते खुले करण्यात आले आहेत.
यामध्ये रोपळे, आंबे, पटवर्धन कुरोली, चळे, भाळवणी, करकंब, खर्डी या मंडळातील अतिक्रमित शिव- पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले.पाणंद, शेतरस्ता व शिवरस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याबाबतच्या महसूल विभागाच्या २९ ऑगस्टच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेस तालुक्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
यावेळी विविध मंडळातील मंडळ अधिकारी, तलाठी ,पोलीस पाटील, तसेच सर्व्हअर उपस्थित होते.

00000

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button