विद्यार्थ्यांचे स्टेट लेवल टेक्निकल इव्हेंट टेकउत्सव 2K25 इव्हेंट मध्ये घवघवीत यश

सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्टेट लेवल टेक्निकल इव्हेंट टेकउत्सव 2K25 इव्हेंट मध्ये घवघवीत यश
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 19/09/2025 :
शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय सांगोला येथील महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या स्टेट लेवल टेकनिकल इव्हेंट टेकउत्सव 2K25 इव्हेंट मध्ये अंदाजे 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदविका ईलेक्ट्रिकल विभागामध्ये तृतीय वर्षामध्ये शिकत असणाऱ्या चि.अनिकेत विजय धानोरकर या विद्यार्थ्यांने सर्किट सुडोकू या इव्हेंट मध्ये प्रथम क्रमांक मिळवला, पदविका संगणक विभागामध्ये द्वितीय वर्षामध्ये शिकत असणाऱ्या कु. पायल प्रवीण जाधव या विद्यार्थिनीने टेक्निकल क्युज या इव्हेंट मध्ये तृतीय क्रमांक मिळवला व पदविका संगणक विभागामध्ये तृतीय वर्षामध्ये शिकत असणाऱ्या चि. चैतन्य दत्तात्रय जरे या विद्यार्थ्यांने इमेज आय क्यू या इव्हेंट मध्ये तृतीय क्रमांक मिळवला या विद्यार्थ्यांची शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय सांगोला येथील महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या स्टेट लेवल टेकनिकल इव्हेंट टेकउत्सव 2K25 इव्हेंट मध्ये घवघवीत यश मिळाल्याचि माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली सदर यशा बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
पदविका संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. फडे जि. एम, तसेच प्रा. शेख व्ही. एम. व प्रा. देशमुख एस.एम. यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लाभले.
###################