अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 02/7/2023 : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाले. अजित पवारांनी बंड करून फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नऊ आमदार आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची आज भर दुपारी शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 29 आमदारांचा पाठिंबा असून अजित पवारांना आणखी अनेक आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. नाशिकमधून अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, प्रवीण पवार, दिलीप बनकर, सरोज आहेर, माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना साथ दिली आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यानंतर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला नंतर त्यांनी महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.