तरससदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १ मेंढी ठार व १ बेपत्ता

तरससदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १ मेंढी ठार व १ बेपत्ता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
नरंदे: तरस सदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात किसन रघुनाथ अनुसे (रा. नरेंद्र, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) या मेंढपाळांची १ मेंढी ठार व १ बेपत्ता आहे.या घटनेमुळे मेंढपाळाचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
मेंढरांना चरण्यासाठी शेतमालक शिवाजी धोंडीराम भंडारी गट नंबर ५१६ डोंगर भाग भंडारी मळा यामध्ये चारत असताना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास तरससदृश्य वन्यप्राण्यांनी हल्ला केला.हा हल्ला मेंढपाळाच्या समोरच झाला. मेंढपाळाने आरडाओरडा केला व वन्यप्राण्यास हुलकावण्याचा प्रयत्न केला परंतु हल्ल्यात १ मेंढी ठार व १ बेपत्ता आहे.
वनरक्षक व वनपाल यांनी घटनास्थळी पंचनामा केला व पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ .डेकणे, डाॅ. एस.डी. जाधव यांनी शवविछेदन केले. यावेळी घटनास्थळी मेंढपाळ किसन अनुसे, धनंजय अनुसे, प्रदीप जोशी, भंडारी, कुंडलिक कांबळे, व आकाश अनुसे, नरंदे शाखाध्यक्ष राजेंद्र अनुसे, महादेव अनुसे, कर्मचारी , वनरक्षक, यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. वन्यप्राण्यांनी दिवसाढवळ्या हल्ला केल्याने मेंढपाळ व शेतकऱ्यांच्या मध्ये भिती निर्माण झाली आहे.