श्री.वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराने अकलूज बाजार समिती सन्मानीत

श्री.वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराने अकलूज बाजार समिती सन्मानीत
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/09/2025 : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या. पुणे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या “वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराने” अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीस सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बाजार समितीस सदरचा पुरस्कार देण्यात येतो. सदरचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नाहाटा यांच्या शुभ हस्ते बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, संचालक बाबुराव कदम, बाळासाहेब माने देशमुख, मारूतराव रुपनवर, शिवाजी चव्हाण, नितीन सावंत व बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी स्वीकारला.
स्थापनेपासून बाजार समितीनी शेतकरी व बाजार घटकाच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. बदलत्या काळाबरोबर विविध क्षेत्रात होत असलेल्या बदलाप्रमाणे आधुनिकीकरणाच्या धोरणानुसार विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. बाजार समितीच्या स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळेच पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत राज्यात ८ वा क्रमांक नुकताच मिळाला होता. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षि कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील , उपसभापती संचालक मंडळ, सचिव, शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांच्या एकत्रित योगदानाने अकलूजची बाजार समिती एक आदर्श बाजार समिती म्हणून ओळखली जात आहे.