ताज्या घडामोडी
खा.धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार

खा.धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज प्रतिनिधी :
माढा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांची माढा लोकसभेच्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल तेज न्यूज व पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा यांच्यावतीने पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत माळवदे यांच्या हस्ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार साप्ताहिक अकलूज वैभव चे संस्थापक संपादक भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे,ओंकार प्रशांत माळवदे उपस्थित होते.
यावेळी धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्व पत्रकार बांधवांनी सहकार्य केले आहे. असेच यापुढे सहकार्य राहावे हिच अपेक्षा व्यक्त करतो असेही मोहिते पाटील म्हणाले.