ताज्या घडामोडी

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 30/12/2025 :
सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची “मिडास मेट्रोलॉजी सोल्युशन” पुणे व “किर्लोस्कर” कोल्हापूर या नामांकित कंपनी मध्ये निवड
श्रीराम पॉलिटेक्निक पाणीव या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या “मिडास मेट्रोलॉजी सोल्युशन” पुणे व “किर्लोस्कर” कोल्हापूर या नामांकित कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

त्यामध्ये डिप्लोमा मेकॅनिकाल विभागामध्ये अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या चि. दिग्विजय शिवाजी जाधव या विद्यार्थ्यांची “मिडास मेट्रोलॉजी सोल्युशन” पुणे व चि. शंभुराजे क्षीरसागर आणि कु. श्रद्धा सावंत या विद्यार्थ्यांची “किर्लोस्कर” कोल्हापूर या नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
या प्रक्रियेमध्ये मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.स्वप्निल निकम, तसेच प्रा. धनवले एस.पी., आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button