ताज्या घडामोडी

✳️ उमंग लोकसंचलित साधन केंद्र बोरगाव या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

✳️ उमंग लोकसंचलित साधन केंद्र बोरगाव या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 
वृत्त एकसत्ता न्यूज 
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/8/2025 :
महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस तालुका उमंग लोकसंचलित साधन केंद्र बोरगाव या संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम मंगल कार्यालय तोडले येथे बचत गटांचे सभासद यांच्या उपस्थितीत खेळी मेळीत पार पडली.
या कार्यक्रमासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूरचे सहा.जिल्हा समन्व्यक अधिकारी दीपक टेकाळे, समाजसेविका तथा पिंक रेवोल्युशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापिका डॉ.श्रद्धा जवंजाळ,जिल्हा उपजीविका सल्लागार सोलापूरचे
राजकुमार पवार,हिंदुस्थान फीड बालाजी सुरवंशी,पशुधन विकास अधिकारी जाधव सर,व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्धी बँक नेवरे,दत्तात्रय पाटील पवार सर (HDFC प्रतिनिधी),तसेच विविध गावच्या महिला सरपंच,सौ.शिबिरा पठाण,अध्यक्षा उमंग CMRC व सर्व कार्यकारणी उपस्थित होते.
या सभेची सुरुवात महिलांचे प्रेरणास्थान असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले.महिलांनी इतनी शक्ती हमे देना दाता या स्फूर्ती गीताने गायन केले.प्रमुख मान्यवर यांचे उमंग लोकसंचालित साधन केंद्र अध्यक्ष,सचिव,व कार्यकारणी मंडळ यांनी उपस्थित मान्यवराचे स्वागत केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना CMRC व्यवस्थापक शिवाजी शेंडगे यांनी प्रस्ताविकमध्ये सीएमआरसी मॅनेजर यांनी उमंग CMRC या संस्थेची कार्यक्षत्रे,स्थापित गट,महिलांना विविध बँकेकडून होणारा कर्ज पुरवठा,विविध प्रशिक्षण,कार्यशाळा व पुढील आर्थिक वर्षात बचत गटांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनची माहिती दिली


त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उमंग CMRC चा सन २०२४-२५ चा अहवाल प्रकाशन करण्यात आला.या अहवालाचे वाचन शैलजा पोतदार लेखापाल यांनी केले. उत्कृष्ट बचत गट १)नागदेवता स्वयं सहायता महिला बचत गट खंडाळी, २)कार्तिकी स्वयं सहायता महिला बचत गट उघडेवाडी,३)सितारा स्वयं सहायता महिला बचत गट नेवरे,४) राजलक्ष्मी स्वयं सहायता महिला बचत गट,तोडले. उत्कृष्ट उद्योजिका महिला १)रेश्मा काटकर – गृह उद्योग,२)अर्चना पिसे – केळी चिप्स आदर्श माता पुरस्कार १)शकुंतला क्षीरसागर,२) गोखरना खटके,३) अनिता सुरवसे,पाक कला स्पर्धा प्रथम क्रमांक रेश्मा डोंगरे इत्यादींचा गौरव करण्यात आला.
डॉ.श्रध्दा जवंजाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,उमंग CMRC अंतर्गत असणाऱ्या सर्व महिलांचे मोफत आरोग्य तपासणी करून दिली जाईल.तसेच आरोग्यबाबत मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली. बालाजी सुरवंशी यांनी मार्गदर्शन करता सांगितले की,दूध डेअरी,पशु खाद्य विविध शासकीय योजने विषय मार्गदर्शन केले.शेवटी दीपक टेकाळे यांनी महिला आर्थिक विकास महिला बचत गटाना करीत असलेले कामाची माहिती दिली तसेच महिलांनी शास्वत उपजीविका निर्माण करून वैयक्तिक व ग्रुप उद्योग केले पाहिजेत असे सांगितले
या उद्योगांना शासनाच्या PMEGP, CMEGP, PMFME या 35 टक्के सबसिडीच्या योजनाच्या माहिती दिली जाते.तसेच NLM योजना म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission) होय.ही भारत सरकारची एक योजना आहे.जी पशुधन उद्योजकता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते.या योजने अंतर्गत मेंढी,शेळी,डुक्कर आणि कुक्कुट पालन यांसारख्या व्यवसायांना भांडवली अनुदान देऊन मदत केली जाते,ज्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होते आणि पशुधनाच्या उत्पादकतेत वाढ होते.
याविषयीं माहिती दिली व बचत गटाचा ६ महिन्याचा कोर्स यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठा कडून सुरु करण्यात आला असून
त्याचे फायदे सांगितले त्यानंतर उपस्थित महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे शेवटी आभार वैशाली बिले यांनी केले. सदर सभा यशस्वी करण्यासाठी माविम जिल्हा कार्यालयाचे मन्सूर पटेल जिल्हा समन्व्यक अधिकारी,दीपक टेकाळे सहा जिल्हा समन्व्यक अधिकारी यांचे व तालुका कार्यालय माळशिरस मधील अधिकारी उमंग CMRC अध्यक्षा व कार्यकारणी,सर्व लेखापाल,क्षेत्र समन्व्यक,समूह साधन व्यक्ती, CTC,LDC यांचे सहकार्य लाभले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button