ताज्या घडामोडी

✳️ आकांक्षा लोकसंचलित साधन केंद्राची ८ वी सर्वसाधारण सभा संपन्न.

✳️ आकांक्षा लोकसंचलित साधन केंद्राची ८ वी सर्वसाधारण सभा संपन्न.

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 22/8/2025 :
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिरस अंतर्गत आकांक्षा लोकसंचलित साधन केंद्र खडूस या संस्थेची ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पाटीदार भवन मंगल कार्यालय अकलूज येथे बचत गटातील सभासदांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सौ.शितलदेवी मोहिते-पाटील (अध्यक्षा,डॉटर मॉम फाउंडेशन) तसेच करिष्मा वनवे (पीएसआय अकलूज पोलीस स्टेशन),मन्सूर पटेल (जिल्हा समन्वय अधिकारी सोलापूर),दिपक टेकाळे (सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी), राजकुमार पवार (जिल्हा उपजीविका सल्लागार),महेश गव्हाणे (बँक ऑफ महाराष्ट्र) व डॉ. मानसी इनामदार,गंगुबाई महादेव साठे (सरपंच गिरझणी) कविता खरात,अध्यक्ष आकांक्षा लोकसंचलित साधन केंद्र,सोनाली ठवरे सचिव सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापक दत्तात्रय गोरे, सहयोगिनी सोनाली मोटे,सुवर्णा लंगोटे,सीएमआरसी लेखापाल विशाल पिसे,उपजीविका सल्लागार अजित गोरे व ग्रामसंघ लेखापाल तसेच सी आर पी आणि खुडूस गण आणि संग्रामनगर गण या संपूर्ण विभागातून आलेल्या 1037 महिला उपस्थित होत्या.
या सभेची सुरुवात महिलांचे प्रेरणास्थान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.
इतनी शक्ती हमे देना दाता या स्फूर्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आवर्जून उपस्थित असलेल्या डॉटर मॉम फाउंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांचे स्वागत कविता खरात अध्यक्ष आकांक्षा लोकसंख्येचे साधन केंद्र यांच्यावतीने करण्यात आले.डॉ मानसी इनामदार यांचे स्वागत सोनाली ठवरे यांनी केले व मन्सूर पटेल जिल्हा समन्वय अधिकारी सोलापूर यांचे स्वागत दत्ता गोरे यांनी केले.दीपक टेकाळे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सोलापुर यांचे स्वागत संस्थेच्या उपाध्यक्ष स्नेहा इंगळे यांनी केले जिल्हा उपजीविका सल्लागार राजकुमार पवार तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे महेश गव्हाणे तसेच गंगुबाई महादेव साठे सरपंच गिरझणी, अमृता इनामदार या सर्व मान्यवरांचे स्वागत संचालक मंडळ यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापक दत्ता गोरे यांनी केली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अहवाल प्रकाशन सोहळा करण्यात आला. अहवाल वाचनाचे काम अध्यक्ष कविता खरात यांनी केले.
आकांक्षा लोकसंख्येचे साधन केंद्राच्या आठव्या वार्षिक सर्व साधारण सभेनिमित्त कौतुक सोहळा उत्कृष्ट गट म्हणून 1) श्री गुरुकृपा स्वयंसहायता महिला बचत गट बागेचीवाडी २)धनलक्ष्मी स्वयंसहायता महिला बचत गट गिरझणी 3)तुळजाभवानी स्वयंसहायता महिला बचत गट संग्रामनगर ४)माऊली स्वयं सहाय्यता महिला बचत गट डोंबाळवाडी खुडूस ५)जय श्रीराम स्वयंसहायता महिला बचत गट चाकोरे ६)महालक्ष्मी स्वयं सहाय्यता महिला बचत गट विझोरी या गटांचा उत्कृष्ट गट म्हणून पुरस्कार देण्यात आला तसेच उत्कृष्ट ग्राम संघ पाणीव ग्राम संघ व आरजू ग्राम संघ आनंदनगर यांना उत्कृष्ट ग्रामसंघ म्हणून पुरस्कार देण्यात आला
तसेच १)कृष्णाई गाय पालन एमएलपी गट विजयवाडी २)सह्याद्री लेडीज शॉपी एमएलपी गट संग्रामनगर ३)कन्हैया शेळी पालन एमएलपी गट कोंडबावी या गटांना उत्कृष्ट एम एल पी गट म्हणून पुरस्कार करण्यात आला.
उमेद अभियान अंतर्गत आदर्श ग्राम संघ बागेचीवाडी या ग्रामसंघाला तीन लाख रुपये निधीचे वाटप करण्यात आले.आकांक्षा लोक संचलित साधन केंद्र महिलांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी आवर्जून प्रयत्न करत आहे म्हणून उद्योजक महिला म्हणून माधुरी कुलकर्णी,रूपाली मुळे, सुप्रिया मूदगल,कीर्ती मंडलेची, आरती बाबर या महिलांचा उद्योजक व्यवसाय महिला म्हणून पुरस्कृत करण्यात आले तसेच आकांक्षा लोकसंचलित साधन केंद्रातील कर्मचारी यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कृत करण्यात आले.
महिलांच्या मनोरंजन साठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित असलेले दिपक टेकाळे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. डाॅ.इनामदार मॅडम यांनी महिलांना आरोग्य विषयी माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे महेश गव्हाणे यांनी एका गटाला एक लाख ते वीस लाखापर्यंतचे बँक कर्ज देण्याची ग्वाही दिली.अकलूज पोलीस स्टेशनच्या पीएसआय वनवे यांनी गुन्हा कसा घडला जातो आणि गुन्हा घडल्यानंतर त्या लोकांना काय त्रास होतो याचा सर्व गोष्टीचा अनुभव त्यांनी महिलांना सांगितला. महिलांनी आपापसात वादविवाद करू नये.महिलांनी उद्योग व्यवसाय करावेत. महिलांना बचतीची सवय लागावी आणि महिलांनी धाडशी बनावे असा सल्ला देण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाचे मन्सूर पटेल जिल्हा समन्वय अधिकारी यांनी गटाची पंचसूत्री दशसूत्री सांगून ग्राम संघ , mlp गट, उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांना कसे सबसिडी मधून cmegp,pmegp या योजनाची माहिती दिली.महिलांची बचत गटाला व ग्राम संघाच्या मीटिंगसाठी उपस्थिती वाढ करण्यासाठी प्रयत्न करा व वार्षिक सर्व साधारण सभेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.शितलदेवी मोहिते-पाटील अध्यक्ष डॉटर मॉम फाउंडेशन यांनी महिलांना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्वतःच्या संसाराचा गाडा कसा करावा.याविषयी मार्गदर्शन करीत असताना थोडं मैत्रिणी बरोबर गप्पा मारणे मैत्रिणीची संवाद करणे आणि मोबाईलचा वापर कमी करण्याच्या सूचना देऊन महिलांना स्वतःच्या कुटुंबाचा विकास करावा व महिला वेगवेगळ्या व्यवसाय उभा करा असे मोलाचे मार्गदर्शन करीत असताना महिलांना आरोग्य विषयी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात महिलांचे मोफत सोनोग्राफी रक्त तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले व सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
आकांक्षा लोकसंचालित साधन केंद्रातील उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिलांचे बचत गटातील स्टॉल उभारणी केली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल विक्रीसाठी आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया मृदगल यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मोहिनी बोरावके संचालक यांनी केले. आकांक्षा लोकसंचलित साधन केंद्राची ८ वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button