सध्या मिश्रकाळ सुरू आहे
संपादकीय पान…………✒️
सध्या मिश्रकाळ सुरू आहे
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक :आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/7/2025 : मिश्रकाळ यासाठी की, समाजाचा एका भाग जो आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध असून संपूर्णपणे पाश्चात संस्कृतीच्या आहारी गेला आहे. दिखावा आणि चांगळवाद हिच या लोकांची ओळख बनत चालली आहे. माणुसकी, परोपकार, दुसऱ्यांबद्दल विचार करण्याची प्रवृत्ती हळूहळू समाजातून लोप पावत आहे. प्रत्येक नात्याला एक व्यवहारिक रूप प्राप्त होत आहे. नीतिमत्ता, विश्वासाहर्ता यांचं महत्व दिवसेंदिवस कमी कमी होत चाललं आहे.
हे झालं उच्च सोसायटीतील हायफाय लोकांबद्दल जे बहुतेक मोठमोठ्या शहरातून वास्तव्य करतात. हे सगळं सुरू आसतांनाच दुसरा एक बहुसंख्य समाज भारतीय संस्कृतिशी नि विचारांशी अजुनही जुळलेला आहे. हा समाज मुख्यत्वे करून ग्रामीण भागात आणि लहान शहरात बघायला मिळतो पण यालाही हळूहळू शहरी संस्कृतीची लागण होत आहे. हा इंटरनेटचा जमाना आहे. इथे कुठलीच व्यक्ती होणाऱ्या बदलांपासून स्वतःला वाचवू शकत नाही.
७०/८० च्या दशकातील वातावरण आज राहिलेलं नाही. ते कधी नि केव्हा बदललं काही कळलंच नाही. माझ्या पिढीने जुना काळ पहिला तसा नवीन काळ ही अनुभवला.
काळाची चक्र खूप मंदगतीने फिरतात. बदल एका दिवसात होत नाही. खूप संथगतीने प्रवास सुरू राहतो. जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा नित्य नवीन शोधामुळे मागे पडत जातात. राहणीमान आणि वेशभुषेत फरक होत जातो.
एक काळ असा होता की, स्त्री आपलं संपूर्ण देह झाकून ठेवायची. पुरुष उत्तेजित होईल असं कुठलंच अंग दाखवत नव्हती. आज सर्रास अंग प्रदर्शन केलं जातं. अंग प्रदर्शन करणं आधुनिकतेचं लक्षण समजण्यात येतं. तोकड्या कपड्यात वावरातांना कंफर्टेबल वाटतं असं त्यांचं म्हणणं आहे. समाजही हळूहळू हे सगळे बदल स्विकारित आहे. काल जे अभद्र वाटत होतं ते आता सर्वमान्य होत आहे.
येणाऱ्या वीस पॅंचेवीस वर्षात जग अजून खूप बदललेलं असेल. लोक एकदम प्रॅक्टिकल होतील. परोपकार नावाची गोष्टच उरणार नाही. आज थोडातरी शेजारधर्म शिल्लक आहे. येणाऱ्या काळात तोही राहणार नाही. फसवणूक आणि विश्वासघाताचं प्रमाण खूप वाढलेलं असेल. नीतिमत्ता कमालीची ढासळली असेल. लोक बाह्य कर्मकांडाला महत्व देऊन धर्माची मुलतत्वे पाळणार नाहीत. बहीण भाऊ, आईवडील, मामा भाचा ही नाती पुर्वीसारखी राहणार नाहीत. वृद्ध लोकांचे खूप हाल होतील. खाण्यापिण्यात खूप भेसळ होईल. नवनवीन आजार माणसांना होतील. शांतीने जगणं खूप कठीण होईल. मानसिक ताणतणाव वाढून लोक मनोरुग्ण वाढतील. एकटेपणामुळे लोक वेडे तरी होतील किंवा आत्महत्या तरी करतील.
आज जसं लग्न करणं आवश्यक समजलं जातं तसं ते राहणार नाही. लोक लग्न करण्यापेक्षा अविवाहित राहून रिलेशनशिप मध्ये राहणं जास्त पसंत करतील. या व्यतिरिक्त अजून खूप काही बदल होऊ शकतात. नैसर्गिक बदल सुद्धा होतील. तंत्रज्ञान खूप विकसित होऊन एकदम पराकोटीलापोचलं असेल. पण या धबाळग्यात माणूस सगळी सुखशांती गमावून बसलेला असेल.
पुनर्जन्म खरोखरच अस्तित्वात असेल तर माझ्यासारखी व्यक्ती पुन्हा जन्म घेण्याची इच्छा करणार नाही.
आज जे काही माणूस भोगतोय त्याच्या कितीतरी पटीने येणाऱ्या भविष्य काळात भोगावे लागण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे जन्म घेणं भविष्यात परवडणार नाही. लोक संख्या भरमसाठ वाढल्याने बेकारी अती प्रमाणात वाढून खाण्यापिण्याचे खूप हाल होतील. या अनुषंगाने गुन्ह्याचे प्रमाण खूप वाढेल. येणारा काळ खूप भयानक असणार आहे. निव्वळ कल्पनेने सुद्धा अंगावर काटा उभा राहतो. एखादा चमत्कारच या सर्व गोष्टींना रोखू शकतो
93 26 36 53 96

