ताज्या घडामोडी

माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी नितीन बनकर

माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी नितीन बनकर

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 24/01/2024 :
माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडी आणि गुरुसेवा शिक्षक परिवार यांचे भव्य अधिवेशन कृष्णप्रिया हॉल अकलूज येथे पार पडले या अधिवेशनात माळशिरस तालुका अध्यक्षपदी नितीन तुकाराम बनकर यांची तर जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी प्रदीप अवताडे यांची निवड करण्यात आली.निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,आमदार राम सातपुते,शिक्षक संघाचे माजी राज्याध्यक्ष बाळासाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन उत्तमराव जमदाडे शिवानंद भरले, विद्यमान चेअरमन रामभाऊ यादव जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र याद्वार कार्यकारी अध्यक्ष विठ्ठल काळे, ज्येष्ठ नेते संभाजी फुले राज्य उपाध्यक्ष बाबा धोत्रे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सरस्वती भालके, सरचिटणीस अंबुता इतापे, कार्याध्यक्षा उमा जाधव,तालुकाध्यक्ष गिरीजा नाईकनवरे ,ज्येष्ठ नेते विठ्ठल नष्टे, मधुकर वनसाळे, पंढरीनाथ लेंगरे,जय-विजय परिवाराचे संस्थापक सुभाष मिसाळ, अल्पसंख्यांक संघटनेचे नेते हुशेन बारसकर, पंढरपूर व सांगोला तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष पांडुरंग नाईकनवरे, उध्दव नागणे,तालुका पतसंस्थेचे संचालक प्रदिप आवताडे, लक्ष्मण वाघ,सचिन गाटे उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकारी खालील प्रमाणे
नितीन तुकाराम बनकर – अध्यक्ष
सादिक अब्दुल शेख – सरचिटणीस
पांडुरंग जोतीराम वाघ – कार्यकारी अध्यक्ष
विजय शिवाजी साळवे – कार्याध्यक्ष, सर्जेराव शिवाजी शिंदे – कोषाध्यक्ष,
सल्लागारपदी डॉ. शिवाजी हरी चौगुले,
बाबूराव पांडुरंग जमाले,
श्रीकांत सुरेश राऊत,
अनिल एकनाथ बोडरे.
उपाध्यक्षपदी गणपत शंकर उमाप, विष्णू शंकर जायभाय, संतोष रंगनाथ काळे, अशोक नागनाथ बनसोडे शामराव रामराव काळे, पांडुरंग श्रीरंग मोहिते.
तालुका संघटकपदी नागनाथ ज्ञानोबा वाघमोडे, समीर नवीलाल कोरबू,
सत्यजित किसन बनकर,
दत्तात्रय बाबुराव कांबळे,
विकास गोविंद बडवे.
सह सरचिटणीस कांतीलाल पांडुरंग मगर,
लालासाहेब जालिंदर जाधव.
प्रसिद्धीप्रमुखपदी बापूसाहेब राजाराम नाईकनवरे,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल काळे यांनी केले सूत्रसंचलन राजाराम गुजर यांनी केले तर आभार नितीन बनकर यांनी मानले.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button