“संधी द्या; नवनिर्मिती करु” जिजामाता कन्या प्रशालेच्या मुलींनी कृतीतून दिला संदेश

“संधी द्या; नवनिर्मिती करु” जिजामाता कन्या प्रशालेच्या मुलींनी कृतीतून दिला संदेश
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor : Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 17/7/2023 : आमच्यामध्ये प्रचंङ उर्जा आहे. आमच्याकङे नवा दृष्टीकोन आहे. प्रतिकुल परिस्थीतीत उपलब्ध साधन सामुग्रीच्या सहाय्यातून आम्ही नवनिर्मिती करु शकतो. हा संदेशच जिजामाता कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सर्वांना दिला.
जिजामाता कन्या प्रशाला अकलूज येथे वर्ग सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ५ वी ते ६ वी, ७ वी ते ८ वी व ९ वी ते १० वी अशा तीन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कोणताही अवास्तव खर्च न करता, उपलब्ध साहित्यातून वर्ग सजवायचे आव्हान देण्यात आले. मुलींची कल्पनाशक्ती पणाला लागली. त्यातून महत्वपुर्ण संदेश देणारी भित्तीचित्रे, अभ्यासांचे तक्ते, सुविचारांचे फलक, मुक्तहस्ते काढलेली चित्रे, घोषवाक्ये, पताका यांनी वर्ग सजले. या मुलींच्या चेहऱ्यावरुन नवनिर्मितीचा आनंद ओसंङुन वाहत होता. परीक्षक परीक्षणासाठी आले तेव्हा या छोट्या मुलींनी केलेली सजावट पाहुन थक्क झाले. एक छोटी संधी दिली तर या मुली काय काय करु शकतात हे प्रत्यक्षात पाहायला मिळाले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. भारती भोसले व प्रा. राजश्री निंभोरकर यांनी केले. स्पर्धेत सुमारे १ हजार १९३ विद्यार्थिनींनी वर्गवार सहभाग घेतला. ५ वी ते ६ वी गटामध्ये प्रथम ६ वी अ, द्वितीय ५ वी अ, तृतिय ५ वी ब व ६ वी ब यांना देण्यात आला. ७ वी ते ८ वी गटामध्ये प्रथम ८ वी अ, द्वितीय ७ वी अ व ब तर तृतीय ८ वी ब व क यांना देण्यात आला. ९ वी ते १० वी गटामध्ये ९ वी अ, द्वितीय ९ वी ब, क व १० वी अ, तृतीय १० वी क यांना देण्यात आला. स्पर्धा प्रमुख म्हणुन माधुरी भांगे व निलम देशमुख यांनी काम पाहीले. मुख्याध्यापिका सुनिता वाघ व पर्यवेक्षक यशवंतराव माने देशमुख यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींच्या कल्पनांना कौतुकाचे बळ देऊन शाबासकी दिली व वर्गशिक्षकांचे अभिनंदन केले.