सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी राष्ट्रीय किसान संवाद यात्रा आंदोलनास सुरुवात

“सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी राष्ट्रीय किसान संवाद यात्रा आंदोलनास सुरुवात
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 09/03/2025 : “सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी राष्ट्रीय किसान संवाद यात्रा आंदोलना द्वारे “शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघा, सह ४५ समविचारी संघटनांच्या वतीने भारताचे पंतप्रधानांना दिल्लीत निवेदन देणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी दिली.
“भारत सरकारने तसेच महाराष्ट्र राज्याचे भाजपा डबल इंजिन सरकारने निवडणुकीच्या अगोदर राज्याने देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करू आणि ती देखील मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये करू असा आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिलेला असल्यामुळे त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या संदर्भात दिरंगाई केल्याने शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्य तसेच राष्ट्रीय पीछडावर्ग अर्थात एनीयूबीसी सर समविचारी ४० ते ४५ संघटनांच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये ०१ जानेवारी २०२५ पासून राष्ट्रीय शेतकरी संवाद यात्रा आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी न्यायमूर्ती सहकार जीडी इनामदार, तसेच माझी जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी कोल्हे साहेब, माजी न्यायाधीश चव्हाण साहेब, ॲडिशनल जिल्हा न्यायाधीश सावंत साहेब, माजी न्यायाधीश श्रीमती जयश्री जाधव तसेच nubc संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष एस गीता नवी दिल्ली तामिळनाडू, राष्ट्रीय कार्याध्यक्ष एस सुवर्ण कुमार केरला, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य शामराव पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष आशिष कारखानिष, राष्ट्रीय महिला संपर्कप्रमुख उमा देशपांडे, राष्ट्रीय सल्लागार एडवोकेट कमलजीत सिंह राणावत, राष्ट्रीय सल्लागार अंजली इम्रती, जम्मू-काश्मीरचे अध्यक्ष शफी भाई कुरेशी, दिल्ली प्रदेशाध्यक्ष जे पी चौधरी, प्रोफेसर मीनाक्षी काळे पाटील अध्यक्ष कर्नाटक राज्य उपाध्यक्ष शुभांगी आईवळे, हरियाणा अध्यक्ष देवी सतीश कुमार, पश्चिम बंगाल कलकत्ता अध्यक्ष शुभ्रातो मोदक, राजस्थान अध्यक्ष राजपाल मीना, अध्यक्ष सोहनलाल मीना, गुजरातच्या महिला अध्यक्ष नीलिमा देसाई उत्तर प्रदेशच्या महिला अध्यक्ष सुषमा बजाज, मुंबईच्या विभागीय अध्यक्ष सुषमा राठोड, प्रदेश महिला अध्यक्ष शीला मोहिते, उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जगन्नाथ कोरडे पाटील, nubc प्रदेश उपाध्यक्ष भाग्यवंत ल. नायकुडे, प्रदेश उपाध्यक्ष नंदकिशोर लोखंडे पाटील, सिद्धेश्वर आप्पा हेंबाडे, प्रदेश सचिव गजेंद्र पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर महेंद्र काबरा, मंगल सिंग राजपूत अध्यक्ष नंदुरबार धुळे जिल्हा अध्यक्ष श्याम भाऊ पाटील प्रदेश उपसचिव काशिनाथ जाधव पाटील मराठवाडा संपर्कप्रमुख प्रदीप दिव्य वीर जालना जिल्हा अध्यक्ष योगेश कदम हिंगोली जिल्हा अध्यक्ष मारुती चोपडे नांदेड जिल्हा अध्यक्ष अक्षय हुंडेकरी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत नलावडे युवक अध्यक्ष महेश बिस्किटे सातारा जिल्हा अध्यक्ष गणपती यादव उपाध्यक्ष जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कोरडेषषयळळ पाटील युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, प्रदेश राष्ट्रीय समन्वयक निवृत्ती बराटे मुंबई विभाग अध्यक्ष एडवोकेट मीना सोनवणे मुंबई विभाग अध्यक्ष संजय वाडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक फाळके महिला अध्यक्ष कीर्ती पुजारी, पुणे विभागीय युवक अध्यक्ष महादेव काजळे पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष अमोल पिसाळ, मुंबई नागपूर विभाग व पुणे जिल्हा महिला अध्यक्षा नीला जयस्वाल, , संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश युवक विद्यार्थी अध्यक्ष राणा प्रेमजीत सिंह राजे पवार तसेच गुजरात अंदमान निकोबार गोवा कर्नाटका तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश केरला राजस्थान बिहार उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब उत्तरांचल उत्तराखंड पश्चिम बंगाल वेस्ट बंगाल जम्मू व काश्मीर या राज्यांचा सर्व पदाधिकारी या आंदोलनात सहभाग होणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
संघटनेच्या प्रमुख मागणीमध्ये देशभरातील शेतकरी हा कर्जाच्या भोजाखाली सातत्याने दाबलेला आहे त्याला राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार आहे संघटनेने उच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाकडे तक्रार दाखल करून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण बेकायदेशीर लाभलेले विज बिल मिळवून दिलेली आहे तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती मिळवून देणे हे संघटनेचे काम आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारने ते मान्य केलेच पाहिजे कारण केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालावर कधी १००% हमीभाव दिलेलं नाही प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना हमीभाव देताना किमान ३५ ते ४६% टक्के इतका दर कमी दिलेला आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जफेड परत करता आलेली नाही या सर्वांना जबाबदार म्हणून केंद्रांनी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची चरचकट संपूर्ण कर्जमुक्तीचं र देशातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी यासाठी संघटनेने राष्ट्रीय शेतकरी संवाद यात्रा शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्र राज्यातून केलेली असून ही यात्रा देशभरातील जवळपास १३ ते १४ राज्यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करत दिल्ली सरकारकडे निवेदन देऊन मागणी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी संवाद यात्रा आंदोलन सुरू केलेल्या या आंदोलनात शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य, ग्लोबल ऍग्रो फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य किसान महामंडळ, राष्ट्रीय पिचरा वर्ग अर्थात nubc, या संघटनांसह देशभरातील ४५ ते ५० संघटना सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. संघटनेच्या वतीने मे महिन्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री अर्थमंत्री सहकार व गृहमंत्री यांना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्ज मुक्तीसाठीचे निवेदन पाठवण्यात आलेलं आहे.
राष्ट्रीय शेतकरी संवाद यात्रा शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचा समारोप दिल्ली येथील उपलब्ध असलेल्या मैदानावर देशभरातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देशातील अनेक पक्ष संघटनांचे मान्यवर व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या समावेत होईल त्यानंतर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सहकार व गृहमंत्री अमित भाई शहा, तसेच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण, केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांना इथून पुढे शेतामधील सरसकट संपूर्ण शेतमाल व दूध तसेच भाजीपाला या सर्व प्रकारच्या पदार्थाला बेस रेट अर्थात १००% बेस रेट हमीभाव मिळावा, किंवा राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्याचा उत्पादित होणाऱ्या सर्व शेतमाल बेसलेट हमीभावाने खरेदी करावा यासाठी संघटनेने सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय व राज्य व राष्ट्रीय अन्न आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकांमधून संघटनेच्या बाजूने व शेतकऱ्यांचे हितासाठी चा निकाल मिळालेला आहे त्याचे पालन राज्य व केंद्र सरकारने करावे यासाठीच्या मागण्या निवेदनात द्वारे केले आहेत अशी माहिती विठ्ठल राजे पवार यांनी यावेळी दिली आहे.