रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे, नातेपुते येथे रत्नत्रय प्री प्रायमरी स्कूल सुरू

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे,
नातेपुते येथे रत्नत्रय प्री प्रायमरी स्कूल सुरू
Akluj Vaibhav News Network Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 20/6/2023 :
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदशिवनगरचे रत्नत्रय प्रि प्रायमरी स्कूल नातेपुते येथे या शैक्षणिक वर्षापासून घनवट बिल्डिंग येथे सुरू करण्यात आले आहे. सदर स्कुलचे उदघाटन बुधवार दिनांक 15 जून रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तर प्रमुख अतिथी म्हणून वारीसेन दोशी, व काय॔क्रमाचे अध्यक्ष नातेपुते येथील सुप्रसिध्द डॉ. एस. पी. मोरे, बाहुबली चंकेश्वर , अजित दोशी , सदशिवनगरचे सरपंच विरकुमार अनंतलाल दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रमोद अनंतलाल दोशी, वैभव शहा, रोनक चंकेश्वरा , दिगंबर लाळगे, वज्रकुमार चंकेश्वरा, अमित गांधी, प्रितम दोशी, अमित शहा, रत्नेश दोशी, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कर्णे, बबन गोफणे, सुरेश धाईजे , पोपट साळवे , ज्ञानेश राऊत, अमित पाटील , दैवत वाघमोडे उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी बोलताना सचिव प्रमोद दोशी म्हणाले “नातेपुते परिसरातील अनेक पालकांच्या मागणीचा विचार करून आम्ही नातेपुते येथे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी रत्नत्रय प्री प्रायमरी स्कूल सुरू करण्यात आले आहे, अत्यंत माफक फी मध्ये केंद्रीय शिक्षण पद्धतीचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे, तरी या संधीचा पुरेपूर लाभ या परिसरातील पालकांनी घ्यावा,” असे आव्हान त्यांनी केले. बाहुबली चंकेश्वरा यांनी “रत्नत्रय शिक्षण संस्था ही नातेपुते परिसरात लवकरच आपले स्थान निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला”. डॉ मोरे यांनी “सर्वगणसंपन्न पिढी घडिण्यासाठी नातेपुते येथे रत्नत्रय सारख्या शिक्षण संस्थेची गरज होती, व ती गरज रत्नत्रय पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.” अध्यक्ष अनंतलाल दोशी म्हणाले “नातेपुते परिसरातील तळागाळातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे.”
सूत्रसंचालन माधुरी रणदिवे तर आभार प्रदर्शन वैभव शहा यांनी केले. यावेळी पालक व विद्यार्थी उपस्थित होते.