हडपसर नागरिकांच्या,नागरी समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी ठळक मागण्या

हडपसर नागरिकांच्या,नागरी समस्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे लेखी ठळक मागण्या
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
पुणे / मुंबई दिनांक 13/09/2025 : पुणे शहर व जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी हडपसर येथील नेताजी मंगल कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या नागरिक मेळाव्यात विविध नागरी समस्यांबाबत मागण्या पालकमंत्र्यी तथा उपमुख्यमंत्री व महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मांडल्या आहेत. महापालिकेने महापालिका कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमध्ये कोणताही अधिकृत विकास नाही. समाविष्ट केलेला गावांमधून प्रचंड प्रमाणामध्ये महसूल मिळतो आहे तो पीएमटी व इतर माध्यमातून किंवा टॅक्स द्वारे महापालिकेने तात्काळ सुधारणा व सुविधांच्या संदर्भात निर्णय न घेतल्यास महापालिकेत समावेश केलेल्या गावांनी कोणत्याही टॅक्स महापालिकडे भरू नये असे जाहीर आवाहन संघटनेच्या वतीने केले आहे. सदर बाबतीत संघटनेने माननीय उच्च न्यायालयात रीट पिटीशन दाखल करण्याचा इशारा देखील दिला आहे. अशी माहिती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष, संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी सांगितली.
नागरिकांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
• नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा नव्याने समावेश केलेल्या गावांमधील नागरिक एक दमडाई टॅक्स भरणार नाही याची महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. महापालिके विरोधात नागरी सुविधा नाहीत तर नागरिक कोणताही टॅक्स भरणार नाहीत अशी भूमिका, महापालिका शासन प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात देखील मांडली जाईल.
• रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे तात्काळ हटवून रुंदीकरण करण्यात यावे.
• बेकायदेशीर बांधकाम परवानग्यांवर स्थगिती देऊन बिल्डरविरोधात कारवाई करावी.
• पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून “पुणे पूर्व हवेली महानगरपालिका” स्थापन करावी.
• नव्या गावांमध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार विभाग रचना बदलून १२ ते १४ वाढ निर्माण कराव्यात.
• पीएमसी बससेवा व बसस्टॉप तातडीने सुरू करावेत; विशेषतः हडपसर–मुंडवा–मांजरी–महादेवनगर या मार्गावर १५ क्रमांकाची बस सुरू करावी.
• मुंडवा महात्मा फुले चौक येथे डबल डेकर उड्डाणपूल उभारण्यात यावा.
• बेकायदेशीर ट्रक, बस व रिक्षा वाहतूक तातडीने बंद करून कठोर कारवाई करण्यात यावी.
• अलीकडील अपघातांमध्ये मृत झालेल्या मुलींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी.
• रस्त्यांच्या कडेला असलेल्या फुटपाथवरील मंडई, विक्रेते व बेकायदेशीर धंदे हटविण्याबाबत कठोर पावले उचलावीत.
यासंदर्भात नागरिकांच्या वतीने विठ्ठल राजे पवार, अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक, शरदजोशी विचारमंच – शेतकरी कामगार एम.एस. फाऊंडेशन शेतकरी संघटना महासंघ यांनी निवेदन सादर केले. या प्रसंगी, संघटनेच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ भारती चव्हाण, प्रदेश युवक विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रवी उर्फ राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, अनिल भांडवलकर (युवक अध्यक्ष पुणे शहर जिल्हा), महेश गिरी (युवक अध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ), डॉ. राजू चौधरी (पुणे शहर हवेली अध्यक्ष), डॉ. प्रकाश पाटील (अध्यक्ष पुणे जिल्हा व शहर), संतोष पाचंगणे (संपर्कप्रमुख) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी सांगितले की, जर या मागण्यांवर तातडीने कार्यवाही झाली नाही, तर कायद्याचा अवलंब करून मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी दिला आहे, नागरी सुविधा नाहीत तर नवीन समाविष्ट गावातील लोकांकडून कोट्यवधी रुपयांचा जो महसूल जमा केला जातो तो थांबवला जाईल रोखला जाईल याची महापालिकेने दखल घ्यावी असा इशारा देखील संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिलेला आहे.